Mumbai

?️ Big Breaking..राज्य सरकारची अन लॉक ची नवी नियमावली जाहिर…काय आहे  नवी नियमावली..नाट्य गृह,सिनेमा गृह,मल्टी प्लेक्स होणार सुरू..

राज्य सरकारची अन लॉक ची नवी नियमावली जाहिर…काय आहे नवी नियमावली..नाट्य गृह,सिनेमा गृह,मल्टी प्लेक्स होणार सुरू..

मुंबई: राज्य सरकारने अनलॉक संदर्भात नवी नियमावली जाहीर केली आहे.या नुसार नाट्यगृहं, सिनेमागृहं, मल्टिप्लेक्सेस ५० टक्के क्षमतेनं सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. परंतु नाट्यगृहं, सिनेमागृहं, मल्टिप्लेक्सेस मध्ये खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नसेल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून देण्यात आलेले सर्व नियम पाळणं बंधनकारक असेल.

हे खेळ होतील सुरू..

त्याच प्रमाणे बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॉश या इनडोअर खेळांसह इनडोअर शूटिंग रेंज सुरू करण्यासही परवानगी दिली आहे. सॅनिटायझेशनची व्यवस्था आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून खेळाडूंना सराव करता येईल. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सरावासाठी जलतरण तलाव सुरू होतील मात्र कंटेन्मेंट झोनमधील जलतरण तलाव बंदच राहतील.

योगा होईल सुरू..

कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असणारी योगा अभ्यास केंद्रं सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठीची नियमावली सार्वजनिक आरोग्य विभाग जारी करेल. त्यासाठी हा विभाग केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या नियमावलीचा आधार घेईल, असं सरकारनं पत्रकात म्हटलं आहे.

गेल्या सात महिन्यांपासून राज्यातील चित्रपटगृहं, नाट्यगृहं बंद आहेत. त्यामुळे या क्षेत्राचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. फिजिकल डिस्टन्सिंगसह अन्य नियम पाळून चित्रपटगृहं, नाट्यगृहं, मल्टिप्लेक्सेस सुरू करण्याची मागणी या क्षेत्रामधून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर राज्य सरकारनं मनोरंजन क्षेत्राला दिलासा दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button