अध्र्या दशकापासुन चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी अपुर्ण
– मुख्यमंत्र्यांना निवेदन
चिमूर -ज्ञानेश्वर जुमनाके
चिमूर क्रांती जिल्हा झाला पाहीजे यासाठी शासन व प्रशासन यांना चिमूरकरांनी यापुर्वी अनेक निवदणे,उपोषण दिले.मात्र चिमूरकरांच्या मागणीला राज्यकत्र्यानी नेहमीच वाटाण्याच्या अक्षदा लावल्या आहे. त्यामुळे अध्र्या दशकानंतरही चिमूर क्रांती जिल्याची मागणी अपुर्ण आहे. या मागणीसाठी ४ जानेवारी शनीवार ला चिमूर क्रांती जिल्हा कृती समीतीने काळा दिवस पाळून इशारा पत्र तहसीलदार संजय नाग टिळक यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदण दिला आहे.
चिमूर क्रांती जिल्हा झाला पाहीजे कारण स्वातत्र्यलढयात अप्रतिम कामगीरी बजावलेला हा परिसर जिल्हा मुख्यालय न झाल्याने दुर्लक्षीत झाला आहे. ही मागणी १९७० पासुन परिसरातील जनता सातत्याने करीत आहे. चिमूर क्रांती जिल्हा मागनीला राज्यकत्र्यानी नेहमीच वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहे. यासाठी शासनाला अनेक पत्रव्यवहार व विवीध पद्धतीने मागणी केली मात्र शासन या मागणीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे. यापुर्वी ५ जानेवारी २००२ ला चिमूर क्रांती जिल्हयाच्या मागणीसाठी नागरीकांनी मोर्चा काढुन प्रशासकीय इमारत जाळली होती. ५ जानेवारी हा दिवस चिमूरकर काळा दिवस म्हणुन चिमूरकर पाळतात. चिमूर जिल्हा निर्माण व्हावा ही मागणी प्रथम स्वातंत्रसंग्राम सेनानी स्व. दामोदर काळे गुरुजी यांनी केली होती. त्यानंतर सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते सामाजीक संघटनांचे प्रतिनीधी एकत्र येवुन चिमूर क्रांती जिल्हाकृती समितीची स्थापना करून या मागणीचा अनेक दिवसापासून पाठपुरावा करीत आहेत. चिमूर जिल्हा निर्माण व्हावा या मागणीसाठी तत्कालीन सरकार व विरोधी पक्ष म्हणुन कार्यरत असताना या मागणीचे समर्थन केले होते. ते हल्ली सत्तेत आहेत मात्र त्यांनी जाणीवपुर्वक दुर्लक्षीत करीत असल्याचा आरोप समितीच्या निवेदनात केला आहे.
नविन जिल्हा निर्माण करतेवेळी आदीवासी वगैर आदीवासी क्षेत्र असा चुकीचा विचार करून विभाजनाला दुरदृष्टी न ठेवता निर्णय कार्यान्वीत करताना गडचिरोली हा नविन जिल्हा निर्माण करन्यात आला या जिल्हा निर्मीतीच्या वेळी सर्व प्रशासकीय समितीचे अहवाल चिमूर जिल्हा निर्मीतीच्या बाजुने असताना नियम धाब्यावर बसवुन चिमूर या लोकसभा क्षेत्राला डावलण्यात आले होते ही वस्तुस्थीती आहे. महाराष्ट्रात जेव्हा नविन जिल्ह्याची निर्मिती झाली तेव्हा प्रत्येक वेळी चिमूर ला डावलण्यात आले आहे. या मागणीला पुर्ण करण्याकरीता देशाच्या मा.राष्ट्रपती पासुन तर या परिसरातील सामान्य जनतेपर्यत अनेकांनी टाहो फोडला परंतु शासनकर्यानी चिमूरच्या जनतेसोबत खेन्म केलेला आहे. भौगोलीक परिस्थीतीचा अभ्यास करून तथा परिसरातील ऐतीहासीक भावणा लक्षात घेवुन चिमूर क्रांती जिल्हा घोषीत करण्यात यावा.
युतीच्या सरकारने चिमूर ला अप्पर जिल्हा देवून जिल्हा मिर्मीतीकडे वाटचाल केली. मात्र अजुनपर्यत चिमूर ला क्रांती जिल्हा म्हणुन शासनाकडुन मान्यता मिळाली नाही. प्रशासकीय इमारत तहसील जाळपोळ प्रकरनाची पुन्हा पुनरावृत्ती होवु नये यांची खबरदारी घेवुन महा विकास आघाडीच्या सरकारने चिमूर क्रांती जिल्हयाच्या मागणीकडे विशेष लक्ष देवून चिमूर क्रांती जिल्हा निर्मीती करन्याची मागणी चिमूर क्रांती जिल्हा कृती समिती चिमूर यांनी मुख्यमंत्री यांना पाठवीलेल्या निवेदणातुन केलीआहे. निवेदण देताना बाळकृष्ण बोभाटे प्रकाश बोकारे, नरेंद्र राजूरकर, प्रा.संजय पिठाडे,दयाराम रामटेके, राजेंद्र लोणारे, देवानंद गावंडे, अमेम नाईक, बालाजी कोयचाडे, करुणा मेश्राम, सिंधू रामटेके, लिलाबाई नंधरधने, विकास घोन मोडे, सुरेश पिसे, ज्ञानेश्वर धोंगडे आदी उपस्थित होते.






