Latur

जीवनदीप बहुउद्देशीय शैक्षणिक सेवाभावी संस्थेने राबविले कोरोनाविषयी जनजागृती अभियान

जीवनदीप बहुउद्देशीय शैक्षणिक सेवाभावी संस्थेने राबविले कोरोनाविषयी जनजागृती अभियान

लातुर प्रतिनिधी-प्रशांत नेटके

ठोस प्रहार वृत्तसेवा:- निलंगा

जीवनदीप बहुउद्देशीय शैक्षणिक सेवाभावी संस्थेने निलंगा शहरात कोरोना जनजागृती विषयी अभियान राबवले. त्या अभियानाअंतर्गत शहरातील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार श्री गणेश जाधव साहेब, तालुका आरोग्य कार्यालयामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ श्रीनिवास कदम साहेब, उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ सौंदळे डी के साहेब,कृषी अधिकारी कार्यालयात तालुका कृषी अधिकारी श्री नाब्दे एस एल यांच्या वतीने कृषी सहाय्यक सारगे एस जि, कृषी सहाय्यक बिराजदार एस एच, उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी श्री विकास माने साहेब, नगर परिषद कार्यालयात सी ओ यांच्या वतीने पाणी पुरवठा इंजिनियर देवकते जि के साहेब ,पोलीस स्टेशन कार्यालयात पोलीस निरीक्षक चोरमले अनिल यांच्या वतीने पोलीस ठाणे अंमलदार विशाल अंबर यांनी स्वीकारले.

वरील कार्यालयात कामानिमित्य आलेल्या नागरिकांना,शहरात, शहरातील नागरिकांना कोरोना संसर्ग याविषयी माहिती देणारे माहिती पत्रिका , वाटप करण्यात आले .युथ फॅशन निलंगा यांच्या सौजन्याने डॉ सतीश जाधव ,महेश जाधव यांच्या हस्ते व यावेळी जीवनदीप संस्थेचे पत्रकार गुरुनाथ मोहोळकर, हरिभाऊ टोंपे, हाणमंत टोंपे, हेमंत टोंपे,सौ नयनतारा जाधव,व संस्थेचे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button