Amalner

Amalner: सामाजिक कार्यकर्ते सचिन खंडारे डॉ ए पी जे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मानित..

Amalner: सामाजिक कार्यकर्ते सचिन खंडारे डॉ ए पी जे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मानित..

अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन खंडारे यांना डॉ ए पी जे अब्दुल कलाम पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम क्रांती ज्योती प्रतिष्ठान,नंदुरबार व रायबा बहुउद्देशीय संस्था,धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याने यंदाचा डॉ ए पी जे अब्दुल कलाम पुरस्कार धुळ्याच्या महापौर प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला. सचिन खंडारे हे विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. आरोग्य तपासणी, मतदान कार्ड शिबिर यांचे आयोजन करत असतात. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत सामाजिक संस्थांनी त्यांचा पुरस्कार प्रदान करून गौरव केला आहे.

यावेळी बिपीन पाटील, गोरख देवरे, ॲड राकेश पाटील,प्रफुल्ल पाटील,प्रमोद पाटील आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button