Amalner

अमळनेर: जागतिक HIV/AIDS दिन सप्ताह निमित्त आरोग्य व कायदे विषयक कार्यक्रम उत्साहात संपन्न

जागतिक HIV/AIDS दिन सप्ताह निमित्त
आरोग्य व कायदे विषयक कार्यक्रम उत्साहात संपन्न

आज दि 7 डिसेंबर2021 रोजी जागतिक HIV/AIDS दिन सप्ताह निमित्त , आधार संस्था अमळनेर वतीने,गांधलीपुरा भागातील वारांगना महिलांना आरोग्य व कायदे विषयक कार्यक्रम आयोजिण्यात आला होता सदर कार्यक्रम हा शहरातील रेड लाईट एरियात घेण्यात आला या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर महिला मंचच्या अध्यक्ष डॉ अपर्णा मुठे , प्रकल्प अधिकारी श्री वीरेंद्र दुबे , आधार संस्थेच्या डॉ भारती पाटील , श्रीमती रेणु प्रसाद, ICTC समुपदेशक श्री अश्वमेघ पाटील , दिपक शेलार श्री मोरे, जिल्हा टीबी समन्वयक दीपक संदानशिव हे उपस्थित होते कार्यक्रम सूत्रसंचालन प्रकल्प व्यवस्थापक श्री विक्रम शिंदे यांनी केले तर प्रास्ताविक श्रीमती भारती पाटील यांनी केले. प्रमूख पाहुणे श्री दुबे सर यांनी अश्या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थाने प्रशासन आणि तुमच्यातील दरी कमी होत असते असे कार्यक्रम वारंवार होणे गरजेचे असल्याचे सांगितले तर श्रीमती डॉ मुठे यांनी महिलांना विविध कोर्सेस महिला मंच तर्फे शिकविले जातील हे यावेळी सांगितले.श्री अश्वमेघ पाटील यांनी एच आय व्ही/एड्स बाबत सविस्तर माहिती दिली ICTC आधार संस्था आणि सदर महिला यांच्यातील भावनिक नाते स्पष्ट करतांना ICTC तर्फे मिळणाऱ्या सुविधा बाबत माहिती यावेळी त्यांनी सांगितली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी समुपदेशक कल्पना सूर्यवंशी , श्रीमती अश्विनी भदाणे ओ आर डब्ल्यू यास्मिन शेख,संजय कापडे, आराज सैय्यद,अनिता बडगुजर,फरीदा काझी,रंजु जैन,नंदिनी चौधरी,संगीता मैलागीर यांनी अथक परिश्रम घेतले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button