ए.एम न्यूजचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला
उस्मानाबाद प्रतिनिधी:-प्रशांत नेटके
ठोस प्रहार वृत्तसेवा:-
पत्रकार ओंकार कुलकर्णी यांच्यावर गुरुवारी (दि.२६ मार्च) पावणे एकच्या सुमारास वृत्तांकन करण्यासाठी जात असताना अचानक जीवघेणा हल्ला झाला. यावेळी अज्ञाताने केलेल्या दगड फेकीत एक दोन दगड त्यांच्या गाडीला लागले,अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे त्यांना सुरुवातीला काहीच समजलं नाही, सध्या कोरोनाचा कहर सुरू असताना पत्रकार सर्व बातम्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत, मात्र या परिस्थितीत हा हल्ला झाल्याने निषेध व्यक्त केला जात आहे..
याबाबत कळंब तालुका मराठी पत्रकार संघ, भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन सेना यांनी निवेदन देऊन मागणी केली तर आता लवकरात लवकर या हल्लेखोरांना अटक करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे…






