Paranda

वाळू माफियाकडुन देवस्थानच्या  जमीनीचा बेकायदेशीर आणि बिनधास्त पणे  वापर

वाळू माफियाकडुन देवस्थानच्या जमीनीचा बेकायदेशीर आणि बिनधास्त पणे वापर

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

परंडा दि २६( सा.वा )

सिना नदि जवळ असलेल्या व शहरालगतच्या जामगाव रोड व भोत्रा रोड या ठिकाणी केशवराज महाराज देवस्थानची इनामी जमीन आहे. या ठिकाणी मोठया खदानी आहेत या खदानीत पाणी साठवून वाळू माफिया वाळू धुण्यासाठी त्याचा वापर करीत आहेत . ते बेकायदेशिर असुन परवानगी न घेता वाळू तस्करांकडून व देवस्थान संबधी व्यक्तीकडून राजरोसपणे अवैदय वाळू साठपा करून रात्री अपरात्री वाळू माफिया राजरोसपणे वाळू विक्रीचा धंदा करीत असल्याची तक्रार देऊन देखील प्रशासन कारवाई करेना अनं वाळूमाफिया काही थांबेना
या संबधी इनामी जमीनीचे प्रतिबंधित मालक राहुल भास्करराव देवळे यांनी जिल्हाधिकारी , तहसीलदार , पोलीस अधिकारी यांच्याकडे रितसर तक्रार करून महिनाभर झाले तरी अदयापही कुठलीही कार्यवाही वाळूमाफियांवर झाली नाही.

वाळू माफियाकडुन देवस्थानच्या  जमीनीचा बेकायदेशीर आणि बिनधास्त पणे  वापर

देवस्थानच्या इनामी जमीनीतील खदानीतील पाण्याने वाळू माफिया वाळू धण्यासाठी वापर करीत आहेत ,
सदरील जमीन हि देवस्थानच्या मालकीची असून त्या ठिकाणी शासनाची कुठलीही परवानगी न घेता वाळू धुण्याच्या नावाखाली जमीनीचा गैरवापर चालू आहे
सदरील जमीन ही शहरालगत असून अनेक शालेय विदयार्थी, महिला, शेतकरी या रोडने ये जा करतात. भर रस्त्यातच वाळू धूतली जात असल्यामुळे सामान्य माणसाला नाहक त्रास होत आहे. कित्येक वेळेस वादाचे प्रसंग झालेले आहेत.या जमीनीमध्ये भल्या मोठया खदानी असून त्यामध्येच वाळूचा साठपा केला जातो. रात्री अपरात्री टॅक्टरमार्फत चोरून वाळू विक्री होते. महावितरणचे पण एखादे नावाला कनेक्शन दाखवून सर्व वाळू आकडा टाकून् धूतली जाते.
नुकतीच दोन महिन्यापुर्वी याच परिसरातील खदानीत वाळू धुताना तहसीलदार व टॅक्टर ड्रॉयव्हर यांच्यात झालेल्या झटापटीमुळे तहसीलदार जखमी झाल्याची घटना ताजी असताना देखील वाळू चोरून विक्रीचे प्रकारात वाढ झाली आहे . अवैदय धंदयास पाठबळच आहे. यातून देवस्थानच्या जमीनीचे पण प्रचंड नुकसान होत आहे. तक्रारी देऊन महिना झाला तरी कुठलीही कार्यवाही प्रशासनाकडून झालेली आहे, तरी नागरिकांच्या व देवस्थानच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने स्पॉट चा पंचनामा करून संबंधितावर योग्य ती कार्यवाही करून हे ठेपे बंद करावेत. आशी मागणी राहुल देवळे यांनी केली आहे .

चौकट ..

जिल्हयात सर्वाधिक वाळूचे पॉईन्ट परंडा तालुक्यात
परंडा तालुक्यातुन अनेक नदया गेलेल्या आहेत त्यामुळे वाळूचे साठे या तालुक्यात सर्वाधिक आहेत . वाळूमाफी हे जेसीबी द्वारे वाहनात वाळू भरून अनुन ती खदानीत किंवा ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे तेथे वाळू धुतली जाते नंतर ती विकली जाते सध्या वाळूला मोठी मागणी असल्याने ज्यादा दराने विक्री होत आहे . संबधित पोलीस ठाणे आधिकारी , कर्मचारी व महसुली अधिकारी यांच्या अर्थपूर्ण संबधातून शासनाला कोट्यावधीचा चुना लावला जात असल्याची चर्चा नागरीकात आहे . नदी पात्राच्या शेजारील शेतातून होणारी वाळूची चोरटी वाहतूक प्रशासणाने थांबवावी आशी मागणी होत आहे . रात्रभर चालणाऱ्या वाळू माफियासह त्यांचा मजुरांचा गोंगाट व वाहणावरचे सांऊड हे बहिऱ्यांनाही कळून येते मग पोलीस , महसुल प्रशासणाला वाळूच्या चोरट्या वाहतुकीचा थांगपत्ता कसा नाही असा प्रश्न उपस्थीत केला जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button