Bodwad

बोदवड ग्रामीण रुग्णालयाच्या छताला गळती रुग्णांचा जीव धोक्यात; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

बोदवड ग्रामीण रुग्णालयाच्या छताला गळती
रुग्णांचा जीव धोक्यात; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

बोदवड ग्रामीण रुग्णालयाच्या छताला गळती रुग्णांचा जीव धोक्यात; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

बोदवड प्रतिनिधी- सुरेश कोळी 
बोदवड येथील ग्रामीण रुग्णालय विविध समस्यांच्या विळख्यात सापडले असून त्यात भर म्हणून आता रुग्णालयाच्या छताला गळती लागली असल्याची माहिती समोर आली आहे.मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
   छताला गळती लागल्याने रुग्णालयाच्या इंजेक्शन व मलमपट्टी विभागात पाणीच पाणी होत असल्याने रुग्णांवर उपचार करतांना वैद्यकीय अधिकारी तसेचं रुग्णालयातील इजेक्शन व मलमपट्टी विभागाच्या कर्मचा-यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.बाबतीत वारंवार तक्रारी करून सुध्दा बोदवड सार्वजनिक बांधकाम उप विभाग यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.तालुक्यातील गोरगरीब जनता येथे उपचारासाठी येत असते त्यामुळे रुग्णांना या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.सध्या गेल्या काही दिवसांपासून परिसरात संततधार सुरू आहे.येथिल रुग्णांलयाच्या छताला गळती लागल्याने रुग्णांवर उपचार करावे कुठे? असा प्रश्न दवाखान्यातील कर्मचा-यांना पडत आहे.
रुग्णालयाची इमारत जुनी असल्याने पावसाच्या पाण्याने तिला मोठा धोका संभवू शकतो. याकडे संबधितांनी तात्काळ लक्ष घालून छताची दुरुस्ती तातडीने करावी अशी मागणी तालुक्यातील जनतेकडून करण्यात येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button