Maharashtra

चिमुर तालुक्यातील बंदर या नविन कोळसा खदाणीला वन्यप्रेमिंचा प्रचंड विरोध-मंजुरी रद्द करण्याची कवडू लोहकरे यांची केंद्रीय पर्यावरण मंत्री यांचेकडे मागणी

चिमुर तालुक्यातील बंदर या नविन कोळसा खदाणीला वन्यप्रेमिंचा प्रचंड विरोध-मंजुरी रद्द करण्याची कवडू लोहकरे यांची केंद्रीय पर्यावरण मंत्री यांचेकडे मागणी

वाघांचा अधिवास नष्ट होण्याच्या मार्गावर

चिमुर-:: चिमुर तालुक्याला राष्ट्रीय ताडोबा अंधारी प्रकल्प लागुन आहे. नुकताच केंद्र सरकारने ४१नविन कोळसा ब्लॉक ला मंजुरी देण्यात आली आहे. त्यात चिमुर तालुक्यातील बंदर या कोळसा ब्लॉक चा समावेश आहे. हा परिसर वाघांसाठी अतिशय संवेदनशील मानला जातो. याच मार्गाने वर्धा येथील बोर धरन, अमरावती येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्प लागुन आहे. या ब्लॉकचा लिलाव झाल्यास या परिसरातील वाघाचे अस्तित्व नष्ट होनार. या भागातील वाघ जाणार कुठे अगोदरच मुरपार कोयला खदानीमुळे जंगल नष्ट झालं. त्याचबरोबर वन्यजीवांचे प्राण पणाला लागले. बंदर येथील जंगल परीसरातील मोठ्या प्रमाणात झाडांची कटाई होइल.पर्यावरण संवर्धनावर त्याचा विपरीत परिणाम होउन पर्यावरणाचे फार मोठे नुकसान होणार. कोळसा वाहतुकीसाठी मोठे मोठे रोड तयार होउन वन्यजीवांसाठी घातक ठरनार. वन्यजीवांचे मोठ्या प्रमाणात अपघात होतील. वन्यजीवांना त्रास होईल.अगोदरच मानव –वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला आहे. वाघाच्या हालचालीवर विपरीत परिणाम होईल. बंदर येथील कोळसा ब्लॉक चा लिलाव झाल्यास मानव वन्यजीव संघर्ष स्फोटक होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी पर्यावरण संवर्धन समिती चिमुर अध्यक्ष तथा वन्यजीव प्रेमी कवडू लोहकरे यांनी तात्काळ बंदर कोळसा ब्लॉक लिलाव रद्द करण्याची मागणी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, माजी वनमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचेकडे करण्यात आली आहे.

कवडू लोहकरे यांचे मत

“” वाघ हा पर्यावरण संवर्धनाचा केंद्र बिंदू आहे. माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी यावर चिंता व्यक्त केली. या प्रकरणी केंद्र सरकारने हा चुकीचा निर्णय मागे घ्यावा. “”

कवडू लोहकरे
अध्यक्ष पर्यावरण संवर्धन समिती चिमुर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button