Pandharpur

गोरगरिबांच्या मदतीसाठी कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग सावंतराव गेले धावून…एक हात मदतीचा

गोरगरिबांच्या मदतीसाठी कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग सावंतराव गेले धावून…एक हात मदतीचा

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना बाधीत लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.आज हा आकडा एक हजार पार जाईल.त्यामुळे कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी पंढरपूर शहरात सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ७ ते १३ ऑगस्टपर्यंत संपूर्ण लॉक डाउन घोषित केला आहे.त्यामुळे वैद्यकीय सेवा वगळता पंढरीत सर्व उद्योग व्यवसाय बंद झाले आहेत त्यामुळे गरीब व अनाथ लोकांचे हाल होत आहेत.त्यांना जेवण मिळणे कठीण होऊन बसले आहे.त्यांच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी पंढरपूर प्रशासन आपल्यापरीने प्रयत्न करत असताना पंढरपूर कोळी महासंघानेही पुन्हा एकदा गरीब गरजू लोकांना अन्नदान करण्यासाठी कंबर कसली आहे.यासाठी कोळी महासंघाचे पंढरपूरचे तालुका अध्यक्ष पांडुरंग सावतराव यांनी आपल्या परीने शक्य होईल तेवढी मदत गरजू गरीबांना देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे एप्रिल महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर अनेक कामगार व बाहेरील लोक पंढरीत अडकून पडले होते.

त्यावेळी ६५ एकर परिसरातील हजारो परप्रांतीय व गरजू गरीब लोकांना त्यांनी स्वतःच्या खर्चाने अन्नदान केलेले आहे.तब्बल दोन महिने त्यांनी आपल्यापरीने अन्नदानाची मदत गरजूंना केलेली होती.कालपासूनही पंढरपूर पुन्हा लॉकडाऊन झाल्याने गरिबांचे हाल होऊ नयेत म्हणून कोळी महासंघाच्या मदतीने पांडुरंग सावतराव यांनी सुरू केलेली अन्नदानाची ही मोहीम सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.त्यांनी कुष्ठरोग वसाहत, महाद्वार घाट,एसटी स्टँड, दत्तघाट या सारख्या अनेक ठिकाणी शेकडो गरजू गरिब लोकांना अन्नदान केलेले आहे.कोळी महासंघाच्या वतीनेही सुरू असलेली ही अन्नदानाची मोहीम आमदार रमेश दादा पाटील व चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अजून पाच दिवस अशीच चालू राहील असे कोळी महासंघाचे पंढरपूर तालुका अध्यक्ष पांडुरंग सावतराव यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button