एक पाऊल मानुसकीचे सोनारी येथिल श्री काळभैरवनाथ अन्नछत्र च्या वतीने पोलिस व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नाष्ट्याचे वाटप
परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे
परंडा ( सा.वा ) दि. २५
कोरोना या संसर्गजन्य रोगाला आळा घालण्या साठी रात्र दिवस कर्तव्य बजावनाऱ्या पोलिस व वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी एक पाऊल मानुसकी साठी उचलुन सोनारी येथिल श्री काळभैरवनाथ अन्नछत्र च्या वतीने या कर्मचाऱ्या साठी दि २५ रोजी पासुन नाष्टा वाटप करण्यात आसुन भोजन ची व्यावस्था करणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष महेश कारकर यांनी दिली .
गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर दि. २५ रोजी परंडा पोलिस ठाण्यातून चहा , नाष्टा देऊन या शुभारंभ करण्यात आला.
यावेळी परंडा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक झक्कबाल सय्यद , सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेबराव राठोड, पोलीस कर्मचारी जगताप मामा, श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी अन्नछत्र ट्रस्टचे अध्यक्ष महेश कारकर ,ट्रस्टचे कोषाध्यक्ष रवींद्र खुळे, अविनाश हांगे, मतिन तांबोळी बाहुबली वायकर, सज्जन गोसावी ,भीमा घाडगे, बाबुराव देवकर ,श्रीकांत फरतडे. अशोक माने ,गणेश कारकर, पप्पू पवार , सागर वायकर, अमोल ईटकर , गोटु गुळमिरे, सुरज गर्जे,वडेकर, हुसेन शेख , चेतन शेलार , सोमनाथ फले, प्रविण गुळमिरे ,राहुल काळे, बबलु शिंदे सह श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी अन्नछत्र ट्रस्टचे सदस्य उपस्थित होते.






