आमदार प्रशांत परिचारकांना जमले ते महाराष्ट्र शासनाला का जमले नाही — गणेश अंकुशराव
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आर्थिक अडचणीत सापडलेल्या गोरगरीबांना शासनाने किमान प्रत्येक कुटुंबाला 10 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आम्ही चंद्रभागेच्या पाण्यात गळाभर पाण्यात उभारुन केली होती. याची दखल घेवून आमदार प्रशांतराव परिचारक यांनी तातडीने पंढरपूर अर्बन बँकेकडून विनातारण व अल्प व्याजदरात प्रत्येक गोरगरीब, छोट्या व्यावसायिकाला 10 हजार रुपयांचे कर्ज मंजुर केले. याबद्दल आ. प्रशांत परिचारक यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत; परंतु जे आमदार परिचारकांना जमले ते महाराष्ट्र शासनाला का जमले नाही? असा खडा सवाल महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी जारी केलेल्या एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे. कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे राज्यात गेल्या कित्येक महिन्यांपासुन लॉकडाऊन सुरु आहे. या काळात हातावरचे पोट असलेल्या कित्येक कुटुंबांची उपासमार सुरु आहे. या काळात पंढरपूरच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रभरात जिथे जिथे कार्यक्षेत्र आहे त्या राज्याच्या सर्व भागातील कष्टकरी-छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना पंढरपूर अर्बन बँकेमार्फत विनातारण तातडीचे कर्ज आ. प्रशांतराव परिचारक …






