पंढरपूर तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी कालिदास कवडे तर उपाध्यक्षपदी सिकंदर ढवळे यांची निवड समारंभ संपन्न
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची ऑनलाईन सभा आज संघाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुळमे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या सभेमध्ये कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच यावर्षात सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे राज्या प्रवक्तेपदी पंढरपूरचे सुपुत्र महेंद्र मधुकर गणपुले यांची तर आसावा प्रशाला सोलापूरचे मुख्याध्यापक जितेंद्र पवार यांची महामंडळाचे विद्या सचिव तसेच श्रावणी बिराजदार यांची महामंडळाचे पुणे विभागीय अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.पंढरपूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे काही पदाधिकारी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त जागी पंढरपूर तालुका अध्यक्ष म्हणून विद्यानंद माध्यमिक विद्यालय बार्डीचे मुख्याध्यापक कालिदास कवडे, कर्मवीर औदुंबररावजी पाटील विद्यालय पंढरपूरचे मुख्याध्यापक सिकंदर ढवळे यांची उपाध्यक्षपदी तर वामनराव माने प्रशाला भैरवनाथवाडीचे मुख्याध्यापक उत्तम लवटे यांनी कार्याध्यक्षपदी, आण्णासाहेब पाटील विद्यालय तिसंगीचे मुख्याध्यापक वामनराव शेळके नूतन ऑडीटरपदी, हनुमान विद्यालय सुपलीचे मुख्याध्यापक अशोक यलमार यांची राज्य कौन्सीलरपदी एकमताने निवड करण्यात आली.
सभेच्या विषयाचे वाचन व सूत्रसंचालन ज्ञानेश्वर माऊली विद्यालय खरसोळीचे मुख्याध्यापक पी. जे. सावंत यांनी केले. तर आभार गोपाळकृष्ण प्रशाला गोपाळपूरचे मुख्याध्यापक प्रमोद पाठक यांनी मानले.
या सभेस संघाचे जिल्हाप्रतिनिधी, प्राचार्य उत्तम कोकाटे, मार्गदर्शक मुख्याध्यापक/प्राचार्य सुभाषराव माने, प्राचार्य शिवाजीराव बागल, प्राचार्य भाऊसाहेब जगताप, प्राचार्य आर. डी. पवार, तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.






