रोग ग्रस्त केळी उपटून फेकली तर… शेतकऱ्यांच्या खर्चाचा वाली कोण..
सावखेडा परीसरात जळगाव केळी संशोधन केंद्र अधिकाऱ्यांची सी. एम व्ही व्हायरस ग्रस्त केळी बांगाचा पाहाणी दौरा
रावेर प्रतिनिधी विलास ताठे
आज दुपारी साधारण अडीच वाजताच्या सुमारास प्राध्यापक डाॅ. एन. बी. शेख, प्रमुख केळी संशोधन केंद्र जळगाव,
डाॅ के व्ही. डाॅ. ए. व्ही आतार.
पवार, बोरनारे , बोराडे उपजिल्हा तंत्रज्ञान कुषी अधिकारी जळगाव, रावेर तालुका कुषी अधिकारी साळुंखे साहेब, राजेंद्र कोंडे,कुषी सहाय्यक. ए एस. रणदिवे, के. बी. चौधरी, सह कार्याध्यक्ष रावेर राष्ट्रवादी विलास ताठे महेंद्र महाजन, प्रवीण बोंडे, यांच्या सह सर्व टिमने कुंभारखेडा येथील रमाकांत बोंडे, गौरखेडा शिवार, निलेश पाटील, शरद चौधरी, कुंभारखेडा शिवार, मनोज पाटील, विकास पाटील, सावखेडा शिवारातील सी. एम व्ही व्हायरस ग्रस्त केळी बांगाची प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करून खात्री केली. व तो व्हायरस सी. एम व्ही व्हायरस आहे असे पुन्हा शेतकऱ्यांना पटवून दिले.
तसेच या रोगाची लागण हि खूप मोठ्या प्रमाणात परिसरातील केळी वर झाली असून, या उपाय केवळ रोग ग्रस्त केळी उपटून फेकणे, तिला नष्ट करणे, हाच एकमेव पर्याय आहे, तसेच केळीतील तण स्वच्छ करून, बांध ही स्वच्छ करणे असे प्राथमिक उपाययोजना सुचना संबंधित शेतकऱ्यांना सांगितले, पण अनेक शेतकरी यांनी सांगितले की, आम्ही हि सी. एम व्ही व्हायरस ग्रस्त केळी रोपे उपटून बाहेर फेकली आहे, तरीही हा व्हायरस चा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात केळी वाढतच आहे,
यामुळे परिसरातील केळी लागवड शेतकरी चिंतेत व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे, म्हणून सदर शेतकऱ्यांना केळी ची टिश्यू कल्चर रोपे पुरविणाऱ्या कंपनी वर कुषी खात्यामार्फत निरीक्षक नेमण्यात यावा, जेणेकरून टिश्यू कल्चर रोपे तयार करून शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध वा पोहोच देताना या प्रत्येक हालचाली, चाचण्या वर तो अधिकार वाॅच ठेवून, त्यांची जबाबदारी. व रोपे तयार करून विक्री करणाऱ्या कंपन्यांवर जबर तसेच धाक निर्माण होऊ भविष्यात केळी उत्पादकांना नुकसान होणार नाही, किंवा केळी रोपे परिपूर्ण वातावरणात जगू शकतील, त्यावर कोणत्याही वातावरणातील बदल. आणि ॲटक, व्हायरस ग्रस्त आढळून येणार नाही, तसेच केळी वर नेहमीच येणाऱ्या रोगाची लागण टिश्यू कल्चर रोपांमध्ये परिणाम करणार नाहीत, अशी खात्री ची निरोगी व रोगप्रतिकारक, निर्जंतुक केळीची रोपे शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध होतील.
यावेळी
कुंभारखेडा येथील महेंद्र महाजन, प्रशांत पाटील, भरत बोंडे, किरण राणे, शरद चौधरी, निलेश पाटील, शे. इरफान शे. कुतुहबुददीन.चिनावल.मनोज पाटील, विकास पाटील,शुभम महाजन सावखेडा. पंकज चौधरी, कुंदन बोंडे, प्रकाश महाजन, मोहन महाजन,देवराम बोंडे, सह मोठ्या प्रमाणात परिसरातील केळी लागवड शेतकरी उपस्थित होते.
तसेच डाॅ. उलहास पाटील कुषी महाविद्यालय कुषीदूत प्रशांत ढाकणे, भूषण वाघ, अक्षय सुपले हेही हजर होते.







