Faijpur

फैजपूर येथे आमदार चषक खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

फैजपूर येथे आमदार चषक खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

सलीम पिंजारी फैजपूर यावल

फैजपूर : फैजपूर येथील टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंटचे करण्यात आले आहे.दि २६ जानेवारी दुपारी बारा वाजता फैजपूर पालिकेच्या म्युनिसिपल हायस्कूल च्या ग्राऊंड वर या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
या खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना दि ३० जानेवारी रोजी होणार आहे यानंतर मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील,सावद्याचे नगरसेवक राजेश वानखेडे,माजी जि प सदस्य रमेश नागराज पाटील,शिवसेना जिल्हा संघटक अफसर खान,शेख अलीम (यावल),शेख शफी(रावेर)यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.यावेळी फैजपूर चे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता शेख कुर्बान हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.यावेळी प्रथम बक्षीस २१ हजार रुपये यावलचे नगरसेवक शेख असलम यांच्या कडून तर द्वितीय बक्षिस फैजपूर येथील सलिम शब्बीर तडवी यांच्या कडून देण्यात येणार आहे.खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा सहभागी होण्यासाठी शेख जाविद,हाजी जमालोद्दीन, शेख कामिल पहेलवान,अरशद पिंजारी यांच्याशी संपर्क साधावा तर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आफताब क्रिकेट अँकडमी तर्फे शेख फारूक अब्दुल्ला,जफर अलि,शेख अमीद(अम्मो),मजहर अलि,शेरखान(यावल)यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button