Chandwad

शेवगावला देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी कायदे व पुनर्वसन माहिती शिबिर

शेवगावला देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी कायदे व पुनर्वसन माहिती शिबिर

चांदवड उदय वायकोळे

अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गृह विभाग, आरोग्य विभाग व स्नेहालय सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आज शेवगाव येथे ‘देहविक्री’ करणाऱ्या महिला भगिनींसाठी कायदे व पुनर्वसन विषयक मार्गदर्शनपर शिबिर आयोजित करण्यात आले होते; राज्य महिला आयोगाची सदस्य म्हणून श्रीमती उत्कर्षा रुपवते यांनी आयोगाची भूमिका व पाठिंबा स्पष्ट केला. विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव एड. भाग्यश्री पाटील, ॲडिशनल एस. पी. मा. रेड्डी व इतर विभागांचे मान्यवर अधिकारी उपस्थित होते.

देहविक्रीच्या व्यावसायामध्ये कुठलीही महिला स्वखुशीने किंवा आनंदाने येत नाही. आधीचे काही कटू अनुभव, घराची परिस्थिती, झालेली फसवणूक अशी अनेक कारणं होय. पण ह्या भगिनींनासुद्धा सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे!

आज उपस्थित सर्वच पाहुण्यांनी ही गोष्ट अधोरेखित केली. त्यांच्यासमोरील प्रश्न अनेक आहेत…मुलांचे शिक्षण, हक्काचे घर, आरोग्य, पर्यायी कामाच्या संधी, समाजाकडून दुय्यम वागणूक बरच काही! या सर्व प्रश्नांवर काम करण्याची गरज असून पुढील काळामध्ये एकत्रित लढा देण्याचा संकल्प आहे.

या वंचित महिलांच्या हक्कांच्या लढाईमध्ये त्यांना अविरत साथ देणाऱ्या ‘स्नेहालय संस्थेचे’ मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button