Chimur

? Crime Diary..डोमा येथील अंगणवाडी सेविका व त्यांच्या कुटुंबियांवर केला जीवघेणा हल्ला..पोलीसांनी ही मुलाला महिलेला केली धक्काबुक्की मुंडले कुटुंब झाले भयभीत

डोमा येथील अंगणवाडी सेविका व त्यांच्या कुटुंबियांवर केला जीवघेणा हल्ला

पण शंकरपुर पोलीस चौकीने दिली एन सी

पोलीसांनी ही मुलाला महिलेला केली धक्काबुक्की मुंडले कुटुंब झाले भयभीत

चिमूर ज्ञानेश्वर जुमनाके

चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या डोमा येथील लता किसनलाल मुंडले ही अंगणवाडी सेविका असून त्यांचे कुटुंब राहत असताना दि २५ सप्टेंबरच्या रात्री गावातील चार युवकांनी विनाकारण सेविकेच्या घरी लाठयाकाठ्यानी येऊन जीवघेणा हल्ला केला तेव्हा शंकरपुर येथील पोलीस चौकीत तक्रार करण्यास गेले असता घडलेल्या घटनेची तक्रार पोलिसांनी सांगितलेली हकीकत न लिहिता दुसरी हकीकत लिहून उलट महिलेच्या मुलाला व महिलेला धक्काबुक्की केली व एन सी देत त्या चार युवकांना अभय दिल्याचा आरोप अन्यायग्रस्त अंगणवाडी सेविका लता मुंडले व किसनलाल मुंडले यांनी केला असून त्या युवकावर आणि तक्रारदार महिलेशी असभ्य वागणूक देणाऱ्या पोलिसावरही कडक कारवाई करण्याची मागणी करीत न्याय द्यावा अशी मागणी केली आहे .

सविस्तर असे की चिमूर तालुक्यातील डोमा येथील लता मुंडले ह्या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असून त्यांचे कुटुंब वास्तव्याने राहत आहे परंतु दि २५ सप्टेंबर च्या रात्री ७ वा दरम्यान डोमा गावातील राकेश देवानंद लांजेवार, अविनाश शंकर ननावरे , वैभव अरुण लांजेवार ,अक्षय ताराचंद गजभे यांनी लाठी काठी घेऊन घरी आले आणि अश्लील शिवीगाळ करीत कोठ आहे रे अशी धमकी देत किसनलाल मुंडले व लता मुंडले ला धककाबुक्की करीत मारहाण केली आणि लता ची ओढाताण करून साडी ब्लॉउज फाडले तसेच किसनलालला डाव्या हाताला व पायाला मारहाण केली
तसेच मुंडले यांचा मुलगा भूषण ला सुद्धा मारझोड केली घटना सुरू असताना दरम्यान तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष याना बोलावले असता त्यांना न ऐकता त्यांना सुद्धा धक्काबुक्की केली .

घटनेच्या दुसरे दिवशी पोलीस चौकी शंकरपूर येथे तक्रार करण्यासाठी मुंडले आपल्या कुटुंबीयासोबत गेले तेव्हा चौकीत खोब्रागडे नामक पोलीस कर्मचारी यांना हकीकत सांगितली असता त्यांनी आमची हकीकत न लिहिता ,महिलेची तक्रार न घेता आपल्याच मताने हकीकत लिहिली आणि मेडिकल करणे संदर्भात बोलले असता सरकारी दवाखान्यात बंद आहे , बाहेर खाजगी दवाखान्यात करण्याची सूचना केली परंतु खोब्रागडे यांनी आम्हाला उलट धक्काबुक्की करून मुलाचा गळा दाबला ,महिलेला धक्काबुक्की केली तसा व्हिडीओ व्हायरल झाला आहे तेंव्हा आता पोलिसांकडून तक्रादार महिलेवरच अन्याय होत असल्याने न्याय कोणाकडे मागावे अशी तीव्र भावना या परिवाराने व्यक्त केली तेंव्हा नवनियुक्त पोलीस अधीक्षक चिमूर तालुक्यात पोलिसांकडून होत असलेल्या अन्यायाकडे लक्ष देऊन कार्यवाही करतील काय ? सकारात्मक न्याय न देता उलट त्या तथाकथित चार युवक आरोपींना आशीर्वाद देत
आम्हाला एन सी पत्र दिले असे मुंडले यांनी सांगितले .

कोरोना काळात अंगणवाडी सेविका कोरोना योद्धा म्हणून कार्य करीत आहे तसेच गुंडा गर्दी करणारे चार युवक महिलेस असभ्य वागणूक देत मारझोड करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येऊन या प्रकाराची उच्च स्तरीय चौकशी करून दोषी चार युवकाना गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी अन्यायग्रस्त मुडले कुटुंबियांनी केली असून सध्या मुंडले कुटुंब भयभीत झाले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button