Pandharpur

लसीकरणासाठी पात्र सर्व नागरिकांची नोंदणी करुन घ्यावी : विवेक परदेशी, नगरसेवक, न.प.पंढरपूर

लसीकरणासाठी पात्र सर्व नागरिकांची नोंदणी करुन घ्यावी : विवेक परदेशी, नगरसेवक, न.प.पंढरपूर
मुबलक प्रमाणात लसी उपलब्ध झाल्यास वार्डाप्रमाणे लसीकरणाचे नियोजन आखण्यात यावे लसीकरण केंद्र व लसीकरण नोंदणी केंद्र हे वेगवेगळ्या ठिकाणीच असावे
प्रतिनिधी
रफिक आतार
लसीकरण नेमके कोणास द्यायचे आहे ही यादी तयार असल्यामुळे पंढरपूरात लसीकरणाचा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे पार पडत आहे. या नियोजनामधुन आपणास एक गोष्ट लक्षात आली,लसीकरणाची नोंदणी व लसीकरण सेंटर हे एक राहिल्यास गर्दी होऊ शकते, सुरक्षित अंतर न राखल्यास धोका निर्माण होऊ शकतो. सदर आलेल्या अनुभवाचा फायदा घेत यापुढेही आपण असेच नियोजन करायला हवे,आपण करुयात.
सरकारने दिलेल्या परवानगी नुसार सर्व पात्र नागरिकांची,जेष्ठ नागरिकांची नोंदणी करुन घेऊ यात जेणे करुन लसी मुबलक उपलब्ध झाल्यास मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम पार पाडता येइल शिवाय आपण प्रभाग तसेच वार्डाप्रमाणे लसीकरणाचे नियोजन करु शकतो. लसीकरणासाठी पात्र नागरिकांची नोंदणी वयानुसार, प्रभाग नुसार, कोमॉरबीड नुसार, प्रथम द्वितीय डोस नुसार करुन घेतली पाहिजे. आवश्यकतेनुसार सदर माहितीचा वापर करता येईल. जशा जशा लसी उपलब्ध होतील त्या त्या प्रमाणे नागरिकांची यादी तयार असल्याने शासनाच्या सूचनेप्रमाणे आपणास सुरक्षीत अंतर ठेउन, नियोजन बद्ध लसीकरण करणे सोपे जाईल. ज्या नागरिकांना शक्य आहे त्यांच्यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी असावी. नोंदणी झाल्यानंतर नागरिकांना कन्फर्मेशन मेसेज यावा. ज्या नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करता येत नाही अशा नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सोडून इतर कोणत्याही मध्यवर्ती ठिकाणी ऑफलाइन नोंदणीची व्यवस्था असावी.
पंढरपूरामधील जवळपास ३७०० नागरिकांच्या दुसऱ्या डोस संदर्भात यादी तयार करुन नियोजन केले आहे. नियोजित यादी मधील काही नागरिक काही समस्यांमुळे किंवा कोरोनामध्ये आणी कोरोनामुक्त झाल्यावर काही दिवस लस घेऊ नका असे डॉक्टर सांगतात त्यामुळे असे नागरिक लस घेऊ शकत नाहीत. ही शक्यता गृहीत धरून लिस्ट मधीलच पुढील नागरिकांना बोलवण्याची यंत्रणा असावी. जेणे करून उपलब्ध लसी वाया जाणार नाहीत आणि त्यानंतर डॉक्टरांचे व शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे सदर व्यक्तींना नियोजीत कालावधी संपल्यानंतर लसीकरण करण्यात यावे.
आपल्याच गावातील काही नागरिकांनी पंढरपूर शहराजवळील गावातील शासनाच्या अधिकृत लसीकरण केद्रांमध्ये लसीचा पहिला डोस घेतला आहे. सदर नागरिकांना लसीकरणाचा दुसरा डोस नेमके कोठे मिळणार याची निश्चित माहिती मिळाली नाही. अशा नागरिकांची लिस्ट बनवुन जास्त लसी मागवुन पंढरपूरमध्ये लवकरच स्वतंत्र लसीकरण करण्यात यावे किंवा लगतच्या ज्या गावात लसीचा पहिला डोस घेतला आहे त्याच गावामध्ये लसीकरणाचा दुसरा डोस वेळेतच नियोजन पध्दतीने त्यांना मिळावा.
जिल्हाबंदी असल्याने काही नागरिकांनी परजिल्ह्यात लसीचा पहिला डोस घेतला पण आता ते आपल्या घरी पंढरपुरात आहेत त्यांच्यासाठीही लसीकरणाचे नियोजन आखण्यात यावे. तसेच काही तांत्रिक समस्या मुळे काही नागरिकांना दुसरा डोस रजीस्ट्रेशन होत नाही.त्यांचे ही रजिस्ट्रेशन तज्ञ कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात अशी मागणी, विनंती मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, प्रांत अधिकारी सचीन ढोले,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले यांना नगरसेवक विवेक परदेशी यांनी केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button