वार्षिक स्नेहसंमेलन धनोत्सव उदघाटन समारंभ
सलीम पिंजारी
फैजपूर-आजच्या तरुणाई साठी यशाचा मार्ग तसा सोपा नाही, यश हे खडतर आहे ते प्राप्त करण्यासाठी अथक परिश्रमाची गरज असते. असे मत मा.प्रा.पी बी सावखेडकर यांनी तापी परिसर विद्यामंडळ फैजपूर संचलित धनाजी नाना महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन धनोत्सवाचे उदघाटन सोहळयाप्रसंगी व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तापी परीसर विद्या मंडळाचे मा. डॉ सुधाकर काशिनाथ चौधरी-उपाध्यक्ष, मा प्रा किशोर रामदास चौधरी,-व्हा चेअरमन, मा.प्रा.मुरलीधर तोताराम फिरके-सचिव,मा प्रा. पी एच राणे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, सर्व उपप्राचार्य प्रा डी बी तायडे,प्रा ए जी सरोदे, डॉ उदय जगताप, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ जी जी कोल्हे, कनिष्ठ पर्यवेक्षिका प्रा वंदना बोरोले,स्नेहसंमेलन प्रमुख प्रा राजेंद्र राजपूत विद्यार्थी प्रतिनिधी जयेश पाटील, विद्यार्थीनी प्रतिनिधी प्राजक्ता काचकुटे व सर्व विद्यार्थी परिषद सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.
मा. प्रा. सावखेडकर पुढे म्हणाले ध्येय निश्चितीची व मार्ग निश्चितीची दिशा ठरवावी तेव्हाच जीवनात यश प्राप्त होईल असे मत व्यक्त करून जंजीर मधील यारी है इमान मेरा ,यार मेरी जिंदगी, हे गाणे सादर केले.
मा शिरीषदादा मधुकरराव चौधरी आमदार रावेर विधानसभा क्षेत्र तथा अध्यक्ष तापी परिसर विद्यामंडळ फैजपूर यांनी स्नेहसंमेलनाला भेट दिली व मनापासून आनंद साजरा करा असे म्हणून हम तो छुपे रुस्तम है, हे गीत विद्यार्था समोर सादर केले. मा.श्री लीलाधर विश्वनाथ चौधरी चेअरमन तापी परीसर विद्या मंडळ,फैजपूर यांनीही भेट देऊन वार्षिक स्नेहसंमेलन धनोत्सव ला शुभेच्छा दिल्या. वार्षिक स्नेहसंमेलन धनोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले त्यात तानाजी ग्रुप डान्स, आदिवासी बिरसा मुंडा डॉन्स, कॉलेज जीवनावर नाटक, सीमेवरील सैनिकावरील नाटक, देश भक्ती वर गीते, सामाजिक संदेश वर नाटक, लावणी ,कोळी गीते, सीनेमातील गीते, तसेच समूहगीत व समूह नृत्य सादर केले. यासोबतच सॅलेड डेकोरेशन, पुष्परचना, पोस्टर प्रेझेंटेशन, खाना खजाना, फनी गेम्स या स्पर्धा घेण्यात आल्या. सांस्कृतिक कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून डॉ के जी पाटील ,प्रा वंदना बोरोले,यांनी काम पाहिले. स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थांनी अथक परिश्रम घेतले






