सायकल रॅली च्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेची जनजागृती
प्रतिनिधी रफीक आत्तार
रविवार ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत व्हर्च्युअल सायकल रॅलीच्या माध्यमातून माझी कुटुंब माझी जबाबदारी योजनेची जनजागृती करण्यात आली.सहभागी सायकल स्वाराना जनजागृती पर टी शर्ट देण्यात आले. पंढरपूर सायकल क्लबने नोंदणी केलेल्या सदस्यांना टी शर्टचे वितरण केले सायकल रॅली च्या सुरुवातीपासून वेळ संपेपर्यंत नियंत्रण केले.सदर टी शर्ट वर माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेचा लोगो,माहीती व कोरोनाच्या कालावधीमध्ये घ्यावयाची त्रिसुत्री काळजी याचे छायाचित्र छापण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी वावरताना दोन व्यक्ती मध्ये सुरक्षीत अंतर ठेवणे, वरचेवर हाथ धुणे, मास्कचा वापर करणे असा त्रिसूत्री संदेश देण्यात आला.
१५० सायकल स्वारानी या रॅली मध्ये सहभाग घेतला. सहभागी सायकल स्वाराना रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांच्या आवडीचा मार्ग व वेळ निवडण्याचे स्वातंत्र्य होते. यामध्ये सहभागी नागरिकांनी प्रदक्षणा मार्ग, शिवाजी चौक ते पंढरपूर गाव प्रदक्षणा, ठाकरे चौक ते कोर्टी गाव, ठाकरे चौक ते गादेगाव ते ईसबावी, पंढरपूर कॉलेज चौक ते वाखरी गाव, सांगोला नाका ते टाकळी रोड ते रेल्वे स्टेशन, सांगोला चौक ते खरडी गाव, माळे वस्ती ते टाकळी गाव ते सोनके तिसंगी, अर्बन बँक ते भक्ती सागर ६५ एकर परिसर असे विविध मार्ग निवडले. ग्रामीण भागातील नागरिकांना शहरी भागातील लोकांमध्ये सायकलींग आवड निर्माण झाल्याचे कौतुक केले.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रोग प्रतिकारक शक्ती चांगली असणे गरजेचे आहे. यासाठी व्यायाम, प्राणायाम, मेडीटेशन, सकस आहार या गोष्टीचा दररोज अवलंब करणे गरजेचे आहे.आज बरेच नागरिक सकाळी सायकलींग करत असताना दिसत आहेत. नागरिकांमध्ये वाढती सायकल ची आवड पाहता आनंद वाटत असल्याचे आरोग्य सभापती विवेक परदेशी यांनी सांगितले. या व्हर्च्युअल सायकल रँलीच्या माध्यमातून आपले दोन्ही उद्देश साध्य होत आहेत गाडी ऐवजी शक्य त्यावेळी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा असे त्यांनी सांगितले माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजना महत्वाची असुन, आपल्या कुटुंबाची काळजी आपण घ्यायची आहे. पंढरपूर तालुक्यातील ४ लाख ४७ हजार ३०० नागरिकांची तपासणी केली आहे. सर्दी,ताप ,खोकला, वास न येणे,चव न येणे, कणकणी येणे,श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे असल्यास त्वरित शासन प्रतिनिधी व डॉक्टरांशी संपर्क साधावा, आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरवात होणार आहे त्यामुळे प्रशासनाला, आरोग्य विभागाला, फिल्डवर काम करणाऱ्या शासन प्रतिनिधींना, आशा कर्मचाऱ्याना सहकार्य करावे अशी विनंती आरोग्य सभापती विवेक परदेशी यांनी केली.






