Parola

?️ कोरोना अपडेट…पारोळ्यात कोरोनाचा प्रवेश

पारोळ्यात कोरोनाचा प्रवेश

पारोळा प्रतिनिधी – कमलेश चौधरी

पारोळा येथील डी. डी. नगर भगत 38 वर्षीय इसम कोरोना पोसिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने पारोळा शहरात एकाच खळबळ उडाली असून सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

23 तारखेला जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, वरणगाव, धरणगाव पारोळा येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 114 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 88 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले तर सव्वीस व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसवाळ येथील 21, वरणगावचे 3, चाळीसगाव व पारोळा येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश होता.

माहिती मिळाल्या नंतर सदर प्रशासकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांनी तातडीने रुग्णाच्या निवासस्थानी जाऊन बाधित रुग्णाला शासकीय आय. टी. आय. येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले.

बाधित रुग्णाचे निवासस्थान व जवळील परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.
बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू असून त्या सर्वांना तपासणी साठी ताब्यात घेणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button