Solapur

पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था,भारत व परिवर्तन फाउंडेशन च्या वतीने सोलापूर येथे सर्वरोग निदान शिबिर

पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था,भारत व परिवर्तन फाउंडेशन च्या वतीने सोलापूर येथे सर्वरोग निदान शिबिर

सोलापूर देवा तांबे

पर्यावरण संरक्षण सोबतच आरोग्याची काळजी व त्यासाठी जनजागृती व रोग निदान इत्यादी कार्य देखिल काळाची गरज आहे हें जाणून,परिवर्तन फाउंडेशन बार्शी व पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था,भारत यांचे संयुक्त विद्यमाने सौंदरे,तालुका बार्शी, जि.सोलापूर येथे सर्वरोग निदान शिबीर घेण्यात आले.
सदर आरोग्य शिबिर संस्थेच्या अध्यक्षा सौ.स्मिता देशपांडे व श्री.फुलचंद जावळे यांच्या नेतृत्वाखाली , माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर साहेब यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने सौंदरे या गावी सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये एकुण २१० रुग्णाची मोफत तपासणी व त्यांना औषध उपचार देण्यात आले.

पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था,भारत व परिवर्तन फाउंडेशन च्या वतीने सोलापूर येथे सर्वरोग निदान शिबिरया शिबिरासाठी पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्था,भारत या संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.देवा तांबे सर व उपाध्यक्षा सौ.संगीता पाध्ये मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रदीप हगरे सर ,दराडे सर, साहिल पठाण, रूपक लोखंडे ,सुजित कसबे, कु.तेजमाला खबले, बुशरा आतार, अल्फीया मुलाणी तसेच सोलापूर जिल्हा पदाधिकारी व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button