Nashik

विभागीय आयुक्तांच्या पत्रानंतर जिल्हाधिकारी नेमिनाथ संस्थेवर कारवाई करतील का?पालकांचे निर्णयाकडे लक्ष

विभागीय आयुक्तांच्या पत्रानंतर जिल्हाधिकारी नेमिनाथ संस्थेवर कारवाई करतील का?पालकांचे निर्णयाकडे लक्ष

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक= नाशिक जिल्हयातील चांदवड शहरातील नेमिनाथ जैन संस्था गेल्या 2-3 वर्षांपासून विविध प्रकरणांनी चर्चेत असून संबंधित स्व धनराजजी मिश्रिलालाजी भन्साळी इंग्लिश मेडीयम शाळेच्या बाबतीत चांदवड गुरुकुल कॉलनी येथील रहिवासी व पालक श्री शांताराम घुले यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली होती.या तक्रारी अर्जाच्या विषयात शांताराम घुले यांनी नमूद केले होते की श्री नेमिनाथ जैन संचलित स्व धनराजजी मिश्रिलालजी भन्साळी इंग्लीश मीडियम स्कूल चांदवड या शाळेच्या अनियमित कामकाज बाबत मान्यता कायमस्वरूपी रद्दबादल करून संगनमताने शासनाची फसवणूक करणारे शिक्षण उपसंचालक,नाशिक विभाग,शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक विभाग जिल्हा परिषद नाशिक या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल होणेबाबत तक्रार 13-3-2023 रोजी दाखल केली होती.
यासंबंधी विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त साहेब यांनी मा अध्यक्ष, जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समिती तथा जिल्हाधिकारी नाशिक याना 6-4-2023 रोजी पाठविलेल्या पत्रात वरील विषय नमूद करून शासन परिपत्रक 4-2-2011 मधील अ क्र 9(अ) नुसार परिपत्रकातील प्रचलित धोरणानुसार पुढील योग्य ती कारवाई करणेस कळविले असून केलेल्या कारवाईबाबत अर्जदारास अवगत करून देनेस सांगितले आहे.तरी जिल्हाधिकारी कार्यालय सदर तक्रारीबाबत नेमकी कोणती कारवाई करेल याकडे पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button