Pandharpur

वीजतोडणी त्वरित थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन,, दिलीप धोत्रे करकब येथे रास्ता रोको करण्यात आला,,

वीजतोडणी त्वरित थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन,, दिलीप धोत्रे करकब येथे रास्ता रोको करण्यात आला,,

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शेतकऱ्यांची आणि घरगुती वीज तोडणी त्वरित थांबवावी तोडलेली वीज कनेक्शन ताबडतोब जोडावी . यासाठी आज करकंब येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मार्च महिनाच्या निमित्ताने सध्या महावितरणकडून मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिकांची वीज तोडणी होत आहे. एकीकडे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर येत असताना. दुसरीकडे वीज नसेल तर ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करायचा ? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना भेडसावत आहे. तसेच अनेक कारखान्यांनी उसाच्या बिलाच्या रकमाही शेतकरी सभासदांना अद्याप दिल्या नाहीत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज काढून महावितरणचा खजिना भरायचा का ? असा सवाल यानिमित्ताने मनसेचे धोत्रे यांनी उपस्थित करत. वीज तोडणीच्या निमित्ताने राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला. राज्यातील सरकार मोठ्या प्रमाणावर वसुलीच्या गैरव्यवहारात अडकल्याचे आरोप होत आहेत. असे असताना विज बिलापोटीचा पैसा महवितरण जमा करुन घेत आहेत. आणि वरिष्ठ अधिकारी वसुलीत अडकले आहेत. त्यामुळे वसुली सरकारने शेतकऱ्यांची वीज तोडणी तात्काळ थांबून वीज बिले माफ करावीत. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिलीप धोत्रे यांनी दिला.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दीपक भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख, मनसे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार, भाजपा जिल्हा सरचिटणीस अजित जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष लक्ष्मणतात्या वंजारी,मारुती अंबुरे, संजय गायकवाड, अमोल शेळके, नंदू व्यवहारे ,सुभाष गूळमे,इत्यादी उपस्थित होते,,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button