Amalner

न.पा च्या शाळा जि प मध्ये वर्ग करू नये राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाची मागणी

न.पा च्या शाळा जि प मध्ये वर्ग करू नये राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाची मागणी

महेंद्र साळुंके

अमळनेर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे तालुकाध्यक्ष नविद शेख यांनी मुख्याधिकारी यांना न पा च्या शाळा जि प मध्ये वर्ग करू नये अशी विनंती चे निवेदन दिले निवेदनची प्रत म नगरविकास विभाग व विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांना ही ईमेल द्वारा पाठविण्यात आले देण्यात आलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की
अमळनेर नगरपरिषदेने महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्रमांक,मा.नगरविकास विभाग कोरोना 2020/प्र.क्र.,76/नवि-14 दिनांक 3 जुलै 2020 अन्वये प्राप्त पत्राचा आधार घेत सर्वसाधारण सभा क्र.38 दि 22 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता न प.सभागृहात आयोजित केली आहे,सदर सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे होणार आहे,या सभेचा अजेंडा न पा सदस्यांना दि 11 सप्टेंबर 2020 रोजी प्राप्त झाला असून या सभेत सुमारे 35 विषय चर्चेला घेतल्याचे दिसत आहे.यात विषय क्रमांक 9 अन्वये न.प.च्या शाळा (न.प.शिक्षण मंडळ अंतर्गत सुरू असलेल्या शाळा) जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा विषय घेण्यात आला आहे.प्रत्यक्षात हा विषय चर्चेला घेणे हेच मोठे अज्ञान असून नगरपालिका यातून आपली जवाबदारी झटकत असल्याचे स्पष्ट दिसत आहे,या शाळा पालिकेला का नकोत याचाही खुलासा होणे आवश्यक आहे.खरे पाहता आरोग्य,शिक्षण आणि इतर नागरी सुविधा देणे ही न प ची प्राथमिक जवाबदारी असताना आपल्या दायित्वाचा न प ला विसर पडल्याचे दिसत असून भविष्यात अग्निशमन यंत्रणा,पाणीपुरवठा योजना व आरोग्य यंत्रणा यावर देखील न प चा खर्च होतो यामुळे त्यादेखील जिल्हा परिषदेकडे वर्ग करा असा विषय न प च्या विषय पत्रिकेत आल्यास नवल वाटू अशीच परिस्थिती सद्यस्थितीत निर्माण झाली आहे.पालिका दरवर्षी नागरिकांकडून कर वसूल करताना शिक्षण कर देखील वसूल करीत असते,आधीच न प हायस्कूल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत,यानंतर प्राथमिक शाळा देखील जिल्हा परिषदे कडे वर्ग केल्यास शिक्षणाचा कोणताही उपक्रम पालिकेकडे शिल्लक राहत नाही,अश्या परिस्थितीत पालिका आपल्या करातून शिक्षण कर कमी करून तशी बिले नागरिकांना देणार का याचाही खुलासा आधी होणे आवश्यक आहे.तसेच शासनाचे प्रतिनिधी असलेले सन्माननीय मुख्याधिकारी देखील या चुकीच्या विषयास मान्यता देण्यास हरकत नाही असा अभिप्राय देतात ही मोठी शोकांतिका आहे.त्यांनी उलट असे विषय चर्चेला देखील घेता येत नाही असा अभिप्राय देणे उचित होते.असा चुकीचा विषय घेतल्याने समाज बांधवांच्या भावना भडकल्या असून शिक्षण मुक्त पालिका करण्याचाच हा प्रयत्न आहे,यास संपूर्ण शहरातून शिक्षण प्रेमी,पालक वृंद आणि विद्यार्थ मित्रांकडून विरोध असल्याने हा विषय विषय पत्रिकेतून वगळण्यात यावा आणि शिक्षणासाठी पालिकेच्या माध्यमातून एखादा नवीन उपक्रम राबविण्याबाबत या सभेत निर्णय घ्यावा ही आमची आग्रहाची विनंती करण्यात आली…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button