Amalner

कट्टा… काडतुस आणि बरच काही..पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांचा कामांचा धडाका…गुन्हेगारांवर वचक..

कट्टा… काडतुस आणि बरच काही..पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांचा कामांचा धडाका…गुन्हेगारांवर वचक..

अमळनेर तालुक्यात गुन्हेगारी चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नवीनच नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी आता कामगिरी दाखवायला सुरुवात केली असून सतत कार्यवाही सुरू आहेत.वाळू माफिया,अवैध धंदे, गांजा आणि इतर सर्वच गुन्ह्यांवर नियंत्रण करण्यासाठी सतत कार्यरत आहेत. कमी वेळात चांगलाच वचक गुन्हेगारांवर निर्माण करण्यात त्यांना यश मिळाले आहे.काल दिनांक २०/०७/२०२१ रोजी बकरी ईद निमीत्त अमळनेर शहरात स्टेशन रोड ते सुभाषचौक दरम्यान SBI बँकेजवळ पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे व त्याचे सोबत पोहेकाँ/४१८ सुनिल हटकर ,पोहेकौँ/ भटुसिंग तोमर, राजेंद्र कोठावदे , पोना दिपक माळी, पोकाँ/ रविंद्र पाटील , पोकाँ विलास बागुल असे नाकाबंदी करीत वाहने चेक करीत असताना रात्री २१.०० वा. चे सुमारास एक ग्रे रंगाची स्विष्ट कंपणीची कार क्रमांक एम एच १२ टीडी ६७९१ ही सुभाष चौकाकडुन आली असता सदर कार हिस थांबवुन तिचे आतील बसलेल्या ४ व्यक्तींचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्याची चौकशी करुन अंगझडती घेतली असता पंकज उर्फ बंटी शंकर भुमकर वय २५ रा. नरे अंबेगाव ता. जिल्हा पुणे याचें कब्जात एक गावठी बनावटीचे पिस्टल ,दोन मॅग्झिन , तिन जिवंत काडतुस असे मिळुन आले. त्यास सविस्तर विचार पुस करता त्याचे साथीदार १) मनोज उर्फ मयुर भाउसाहेब गायकवाड वय २५ रा. चिखली जाधववाडी ता. हवेली जिल्हा पुणे २) औकार प्रकाश नाळे वय २८ रा. द्वारका विश्व , भोसरी पुणे ३) प्रशांत शिवाजी गुरव वय ३० रा. भोसरी पुणे याचे सह उमर्टी -मध्यप्रदेश येथे जावुन तेथुन सदरचे गावठी पिस्टल व जिवंत काढतुस , मॅग्झीन असे विकत घेतले असल्याचे सागीतले त्यावरुन नमुद पिस्टल , जिवंत काडतुस मॅग्झीन , कार, एक मोबाईल हॅन्डसेट असा एकुण १०,४०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
आहे. नमुद चारही आरोपीताविरुध्ध या पुर्वी त्याची प्राथमिक चौकसी करुन माहीती घेतली असता वरील पैकी तिघावर पिंपरी पोलीस स्टेशन पुणे येथे

१) ३९३/२०१६ महा पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे

२)१११/२०१७ महा. दारु बंदी कलम ८५/१

३)७०९/२०१९ महा. पो. कायदा कलम १३५ प्रमाणे

४) ५३०/२०२० महा. पोलीस कायदा कलम १४२ (हद्दपार), एमआयडीसी भोसरी पोस्टे पुणे येथे ५)५५/२०१५ भादवि कलम ४६१,३८० ६)लोणी कंद पोस्टे पुणे येथे गुरन ७३२/१९ भादवि कलम ४०६,३४ या प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे समजले आहे.

वरील चारही आरोपीताविरुध्ध पोकाँ/३३३१ रविंद्र पाटील यानी फिर्याद दिले वरुन गुरन ०३१४/२०२१ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ सह भादवि कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन नमुद गुन्हयाचा तपास
पोहेकाँ/४१८ सुनिल कौतिक हटकर हे करीत असुन नमुद आरोपीतानां गुन्हयात अटक करण्यात ते मा. न्यायलयाकडुन दिनांक २३/०७/२०२१ पावेतो पोलीस कस्टडी रिमांडवर आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button