ही कसली संचारबंदी आणि जमावबंदी….? बाजारात आज तुफान गर्दी…! एकाला अंगाशी… दुसऱ्याला दंड…! चोपडा शहरात लाँक डाऊन चा मज्जा…!
हेमकांत गायकवाड चोपडा
चोपडा : चोपडा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे महाराष्ट्र शासनाने ०५ एप्रिल पर्यंत मिनी लाँक डाऊनची घोषणा केली आहे. यात अत्यावश्यक सेवा फक्त सुरू राहतील. तसेच दिवसा जमावबंदी लागु करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता शहरात अनेक सेवा बिनधास्तपणे सुरू आहेत. चोपडा शहरातील मेंन रोड वरील किराणा दुकान, कपडे दुकान, फुल हार,वाले शनि मंदिर चौक होमगार्ड तैनात, असतांना जनरल स्टोअर्स चालू , तसेच, बोहरा गल्लीत देखील किराणा दुकान सुरू असताना दिसुन आले, व चोपडा शहरातील नागरिक बिनधास्त पणे मोटार सायकल वर, पाई, विना मास्क फिरताना दिसत आहे. व जिथे उभे होते तिथे एका कोपऱ्यात उभे होते. व कोणत्याही प्रकारच्या उपाय किंवा कार्यवाही करतांना आढळुन आले नाहीत. दुसरे म्हणजे लाँकडाऊन आणि दुकाने बंद करणे एव्हढचं आताच्या घडीला प्रशासनाला दिसत आहे. पण किती तरी नियमांचे उल्लंघन सर्रास पणे सुरू आहे.
बहुतेक लोक अगदी प्रशासकीय कर्मचारी देखील रस्त्यावर बिनधास्तपणे थुकतात…. एकीकडे मास्क ची सक्ती करायची एखाद्या गरीब मजुर विना मास्क चा आढळल्यास त्याला ५०० रु ची पावती पाडायला सागतो जो चार वेळा थुकतो…
यावर लवकरात लवकर शासन, पोलीस प्रशासनाने, आरोग्य विभाग,नगरपालिका, लक्ष्य केंद्रित करून कठोर नियमावली करुन कठोरात कठोर निर्बाध करावे. नाही तर परत मृतांची संख्या वाढायला वेळ लागणार नाही…..!






