दोंडाईचा भाजपातर्फे आ.अमरीशभाईच्या विजयाचा जोरदार जल्लोश भाजप कार्यकर्त्यात विजयामुळे उत्साह संचारला…
असद खाटीक धुळे
Dhule : दोंडाईचा धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानसभा निवडणुकीत शिरपुर येथील भाजपाचे उमेदवार श्री आ.अमरीशभाई पटेल यांचा दणदणीत, सर्वाधिक मतांनी आज झालेल्या मतमोजणीत निवड झाल्याने, दोंडाईचा शहर भाजपातर्फे शिवाजी महाराज यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याजवळ विजयाचा जोरदार जल्लोश व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी शहराध्यक्ष श्री प्रविण महाजन यांनी सांगितले की , धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानपरिषेदेवर भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार मा.अमरीशभाई पटेल यांची मोठ्या मताधिक्याने निवड झाली .अमरीशभाई यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर, आक्टोंबर २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा व आमदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या रिक्त जागेवर मार्च महिन्यात निवडणूक जाहिर होऊन संपूर्ण प्रक्रिया पार पडली होती. परंतु कोरोनाच्या संकटकाळात देशभरात लाँक डाऊन करण्यात आले होते. म्हणुन आठवड्याभरावर येऊन ठेपलेली निवडणूक प्रक्रिया स्थगीत करण्यात आली होती. ती प्रक्रिया महाराष्ट्रात नागपुर , अमरावती, औरंगाबाद व पुणे विधानपरिषदेच्या निवडणुकीसोबत दिनांक १ डिसेंबर रोजी पार पडली. त्यात भारतीय जनता पक्षाचे अमरीशभाई पटेल यांच्यासह पाच उमेदवार मोठ्या मताधिक्याने पुढे आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र येत भाजपाचे उमेदवार यांचा पराभव करण्यासाठी अयशस्वी प्रयत्न केले. परंतु भाजपाचे निवडणूक प्रभारी आमदार जयकुमार रावल यांनी आघाडीचेच मते फोडुन आघाडीला जोरदार धक्का दिला व अमरीश पटेल यांना ३३४ मते तर आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांना फक्त ९८ मते पडली आहे. यामुळे आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आलीत असेही शेवटी सांगितले.
यावेळी दोंडाईचा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शहराध्यक्ष श्री प्रविण महाजन यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच नगरसेवक व पदाधिकारींनी फटाके फोडुन एकमेकांना पेढे भरवुन आनंद द्विगुणित व्यक्त केला. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष श्री प्रविण महाजन , सरचिटणीस श्री कृष्णा नगराळे ,श्री जितेंद्र गिरासे, श्री भरतरी ठाकुर , बांधकाम सभापती श्री निखिल जाधव , शिक्षण सभापती श्री राजेश जाधव ,नगरसेवक श्री संजय तावडे , श्रीचिरजिंवी चौधरी , श्री.रविंद्र जाधव ,श्रीखलील बागवान ,श्री नरेंद्र कोळी ,श्री रुपसिंग अण्णा गिरासे उपाध्यक्ष श्री ईश्र्वर धनगर ,ईस्माईल पिंजारी,व्यापारी आघाडी प्रमुख श्री राकेश अग्रवाल,युवा मोर्चा प्रमुख श्री राजु बाबा धनगर ,जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री पंकज चौधरी ,श्री योगेश ठाकुर ,श्री सचिन काळकाटे ,श्री पंकज बोरसे ,श्री प्रमोद अग्रवाल , श्री नरेंद्र बावीस्कर,श्री मनोज निकम ,श्री अनिकेत आव्हाड ,श्री अर्जुन गिरासे ,श्री सागर ठाकुर ,श्री रत्नपाल गिरासे ,इम्रान पिंजारी ,श्री प्रतिक गिरासे ,श्री संजोग रामोळे ,श्री महेश गिरासे ,श्री मनोज थोरात , श्री दिलीप सिंह गिरासे आदी पदाधिकारी उपस्थित होते.






