Solapur

सोलापूर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला महसूल अधिकाऱ्याकडून केराची टोपली

सोलापूर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला महसूल अधिकाऱ्याकडून केराची टोपली

रफिक आतार

पंढरपूर देशासह संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कोरोना विषाणू संसर्ग साथीच्या रोगाने सर्वत्र थैमान घातले असल्याने आपल्या महाराष्ट्रातील आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना सदर विषाणू पासून धोका निर्माण होऊन मानवनिर्मित आपत्ती ची परिस्थिती निर्माण झालेली असून देशांतर्गत आणि बाहेरील जिल्ह्यातून कोरूना चे संसर्ग बाधित रुग्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्याने अधिक प्रमाणात कोरोना ग्रस तरुणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

तसेच सद्यस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यात आणि तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरत असल्यामुळे त्यावर तात्काळ नियंत्रण करणे आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सोलापूर शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कोव्हीड हेल्थ सेंटर व कोव्हीड हॉस्पिटलच्या व्यवस्थेसाठी इमारत अधिग्रहण करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी पंढरपूर येथील महसूल प्रशासन प्रांताधिकारी यांना तसे लेखी आदेश देण्यात आले होते त्याप्रमाणे अधिकारी यांच्या टीमने कोव्हीड रुग्णालय व कोव्हीड सेंटरसाठी येथील खासगी रुग्णालय आणि कॉलेज संस्थांची पाहणी केली होती त्यावेळी काही डब्ल्यू एच ओ चे लोकही या ठिकाणी येऊन त्यांच्याबरोबर पाहणी करून इन्स्पेक्शन केले होते त्या वेळी शहरातील या खासगी हॉस्पिटल आणि कॉलेज संस्थानचा प्रस्ताव तयार करून सर्वांच्या सह्या निशी सर्वानुमते आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे मान्यता अधिग्रहण करण्यासाठी अहवाल तात्काळ पाठविण्यात आला होता.

त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी या अहवालास तात्काळ मान्यता अधिग्रहण करणेकामी दिनांक 17 एप्रिल 2020 रोजी लेखी आदेश देण्यात आला होता. परंतु पंढरपूर येथील महसूल प्रशासन अधिकारी व टीमने मात्र आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला काळिमा फासत केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट झाल्याने सुज्ञ व जाणकर नागरिकांच्या तोंडून बोलले जात आहे.
पंढरपूर शहरातील जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे येथील खासगी तीन हॉस्पिटल म्हणजे जनकल्याण हॉस्पिटल. लाईफ लाईन हॉस्पिटल आणि अपेक्स हॉस्पिटल. हे कोव्हीड हॉस्पिटल म्हणून अधिग्रहण करण्याचा आदेश आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम ६५( १)(ब) नुसार जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन मध्ये बचाव कार्याच्या प्रयोजनार्थ जमीन इमारत किंवा इमारतीचा भाग अधिग्रहण करण्याचा अधिकार अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांना कायदेशीर आहे त्याप्रमाणे तालुकास्तरावर प्रांताधिकारी म्हणजेच त्या ठिकाणचे उपजिल्हाधिकारी च असतात त्यांनी त्यांच्या वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करून त्यांच्या अधिकार हक्काच्या नियमानुसार अशावेळी योग्य तो निर्णय घेणे अपेक्षित होते. परंतु काही राजकीय नेत्यांच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोध आणि दबावापोटी संबंधित अधिकारी यांनी शहरातील खाजगी हॉस्पिटल कोव्हीड रुग्णालयासाठी घेतली गेली नसावीत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याच बरोबर येथील खासगी डॉक्टरांना पाठीशी घालून त्यांचे हॉस्पिटल दवाखाने चालवण्यासाठी येथील प्रशासन अधिकारी यांनी ही भूमिका घेतली असावी असे अनेक तर्क-वितर्क प्रश्न नागरिकांसमोर भेडसावत आहेत. तेव्हा सदर प्रशासनाने हे खासगी रुग्णालय हे कोव्हीड साठी अधिग्रहण करून ताब्यात घेऊन याठिकाणी कोरोना बाधित रुग्णांनावर उपचार करण्यात यावा अशी चर्चा आजही शहर व तालुक्यातील परिसरामध्ये जोराने सुरू आहे.

येथील प्रशासन अधिकारी व कोरोना पार्श्वभूमीवर काम करणाऱ्या टीमचा डाव फसला

पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय हे सामान्य गोरगरिबांच्या विविध आजाराने व्याधींनी ग्रस्त असणाऱ्या चार तालुक्यातील रुग्णांसाठी मोफत उपचार मिळणाऱ्या रुग्णालयावर येथील प्रशासनाने काही राजकीय नेत्यांच्या आणि डॉक्टरांच्या मर्जीने कोव्हीड रुग्णालये बनवण्याचा घाट घातला होता. परंतु शहरातील व या प्रभागातील काही नगरसेवक यांनी आणि 10 ते 12 हजार लोकसंख्या असणाऱ्या या आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी गोरगरीब आणि आमच्या रुग्णांच्या उपचारावर हे प्रशासन गदा आणत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने काही महिला व नागरिकांनी ठिय्या आंदोलन करून प्रशासनास कडकडून विरोध केल्यामुळे प्रशासनाचा या ठिकाणचा कोव्हीड रुग्णालय बनवण्याचा डाव फसला असून प्रशासनाने यावर योग्य ती भूमिका निणँय घेण्यास भाग पाडले आहे हे मात्र नक्की.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button