Pandharpur

पंढरपूरचा तहसिल कुळकायदा शाखेतील कोतवालांना त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी पाठवण्यात यावे अन्यथा शिवबुद्ध युवा संघटना करणार आमरण उपोषण

पंढरपूरचा तहसिल कुळकायदा शाखेतील कोतवालांना त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी पाठवण्यात यावे अन्यथा शिवबुद्ध युवा संघटना करणार आमरण उपोषण

प्रतिनिधी रफिक आत्तार

पंढरपूरच्या तहसील कार्यालयातील कोतवालाच्या सेवा वरीष्ठ कार्यलयास संलाग्नित न करता संबधित त्या त्या सजा कार्यलायास त्वरित वर्ग करण्यातबाबत पंढरपूरचे प्रांताधिकारी यांना शिव बुद्ध संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले असून सदर निवेदनाची दखल न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा शिवबुद्ध युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप मुटकुळे यांनी दिला आहे.मा.अप्पर मुख्यसचिव (महसूल)व वन विभाग मंत्रालय पुणे यांचा तसा आदेश असताना देखील पंढरपूर तहसील कार्यालयातील कुळ कायदा शाखेमध्ये काही कोतवाल सेवा बजावत असताना दिसून येत आहेत तरी संबंधित कोतवालांना त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी पाठवण्यात यावे.सदर कोतवाल तहसिल कार्यलयामध्ये सेवा बजावत असल्यामुळे त्या सजा मधील गावातील लोकांची गैरसोय होत आहे व त्या बाबत अनेक तक्रारी येत आहेत तरी आमच्या निवेदनाची त्वरित दखल घेवून मा.अप्पर आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी. तसेच १५दिवसात दखल न घेतल्यास मा.उपविभागीय अधिकारी कार्यलय पंढरपूर येथे १६मार्च २०२०रोजी बेमुदत आमरण उपोषणास बसण्यात येईल,असा इशारा देण्यात आला आहे.याबाबतचे निवेदन प्रांतकार्यालयाचे नयब तहसिलदार विजय जमादार यांना देण्यात आले यावेळी शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष मोरे,शिवबुध्दचे पंढरपूर शहराध्यक्ष औंकार कुंभार,शाहाजी शिंदे,किरण शिंदे, सुरज पवार,नृसिंह जाधव,इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button