Jalana

मौजपुरी गाव कोरोनामुक्त; हिरकण्या ठरल्या गावासाठी वरदान

मौजपुरी गाव कोरोनामुक्त; हिरकण्या ठरल्या गावासाठी वरदान

जालना : जालना तालुक्यातील मौजपुरी येथे गेल्या दोन वर्षापासून सुुरु असलेल्या कोरोना महामारीला रोखण्यासाठी सतत संघर्ष करीत असून वेळोवेळी सरकारी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातुन गावात कोरोना मुक्तीसाठी प्रयत्न सुरु केले असून त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. गावच्या प्रथम नागरीक सरपंच तथा ग्रामदक्षता समितीच्या अध्यक्षा सौ. ज्योतीताई भागवत राऊत आणि उज्जवल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष सौ. करुणाताई मोरे यांनी कोरोना महामारी रोखण्यासाठी जिवाचे रान करुन कोरोनामुक्त गाव केले आहे. आज रोजी गावात एकही कोरोना रुग्ण अथवा संशयीत रुग्ण नाही. गावातील नागरीकांच्या आरोग्यासाठी दोन महिला (हिरकण्या) यांनी इतर महिला (हिरकण्या) च्या माध्यमातुन घेतलेला पुढाकार गावच्या आरोग्यासाठी वरदान ठरले आहे. त्यांच्या या कामाचे जिल्हाभरातुन कौतुक होत आहे.
गेल्या वर्षापासून कोरोनाच्या संदर्भात शासनाच्या निर्देशा प्रमाणे कामकाज सुरु असून केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सुचनांचे नियमीत पालन करुन कोरोनावर उपाय योजना करण्यात येत आहे. त्यामुळे आज रोजी दि. 2 जुन 2021 रोजी मौजे मौजपुरी येथे एकही कोरोना रुग्ण किंवा संशयीत रुग्ण नाही. तसेच गावात ताप, सर्दी, खोकला किंवा इतर लक्षणं असलेल्या व्यक्ती नाहीत. या संदर्भात उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि मौजपुरी ग्रामपंचायत यांच्या संयुुक्त विद्यमाने नागरीकांना वेळोवेळी ऑनलाईन व ऑफलाईन डॉक्टरांचे मार्गदर्शन करणे, कोरोनापासून बचाव करण्यासाठी काळजी घेणेे, लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांना संपर्क साधने, उपचार करणे, संशयीत रुग्ण असल्यास त्यांचे अलगीकरण आणि विलगीकरण करणे यासाठी मदत करणे अशा उपाय योजना करण्यात आल्या असून आजही त्या उपाय योजना करण्यात येत आहेत.
गावच्या सरपंच तथा ग्रामदक्षता समितीच्या अध्यक्ष सौ. ज्योती भागवत राऊत, उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष सौ. करुणाताई मोरे, रुग्ण व संशयीताची काळजी घेणार्‍या सौ. प्रभा चव्हाण, शाळेच्या मुख्यध्यापक सौ. वंदना अर्जुनराव जयरंगे, गावच्या आशा जरीना शेख, अर्चना मोरे या महिलांनी त्यांच्या कर्तुत्वाने गाव कोरोना मुक्त केले आहे. गावात नियमीत निर्जंतुकीकरण करणे, नागरीकांच्या आरोग्य तपासण्या करणे, लसीकरण मोहिम राबवून त्यात नागरीकांचा सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती करणे, नाल्या सफाई करणे, गावात स्वच्छता मोहिम राबविणे, शासनाच्या नियमाप्रमाणे लॉकडॉऊनचे नियम पाळण्यासाठी नागरीकांना मार्गदर्शन करणे, सकाळी 7 ते 11 याच वेळेत अत्यावश्यक दुकाना सुरु ठेवणे, त्यानंतर सर्व दुकाना बंद करणे, गावात तरुणांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे यासह अनेक उपाय योजना करण्यात आल्या. आज रोजी मौजपुरी येेथे एकही कोरोना पॉझीटीव्ह पेशंट नसून साधी लक्षणं असलेले संशयीत देखील नाहीत. या कोरोना मुक्त गाव माहिमेच्या यशस्वीतेसाठी विरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल राऊत, डॉ. मनोज आढे, सिस्टर प्रभा चव्हाण, के.टी. राठोड, के.व्ही. दाभाडे, आशा कार्यकर्त्या जरीना शेख, अर्चना मोरे व अंगणवाडी सेविका देशमुख, दळवे, डोंगरे यांनी वेळोवेळी मदत करुन उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि ग्रामदक्षता समिती चे अध्यक्ष तथा सरपंच सौ. ज्योतीताई भागवत राऊत, सचिव तथा ग्रामविकास अधिकारी प्रविण पवार, उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ. करुणाताई मोरे, उपसरपंच आप्पासाहेब डोंगरे, बद्रीनारायण भसांडे, सत्यनारायण ढोकळे, सदस्य सौ. लता काळे, सौ. मनिषा डोंगरे, मिरा गायकवाड, सविता जाधव, संतोष मोरे यांनी परिश्रम घेतले. यासाठी सामाजीक कार्यकर्ते भागवत राऊत, बालाजी बळप, बंडूभाऊ डोंगरे, सुनिल मोरे, अंकुश काळे, कृष्णा हिवाळे, बाळू गायकवाड, गणेश डोंगरे, निवृत्ती जाधव, माऊली राऊत, विठ्ठल राऊत यांच्यासह गावातील तरुणांनी पुढाकार घेत कोरोनाला गावातुन पळवून लावले आहे. यावेळी मौजपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि. विलास मोरे, पो. उप नि. रत्नदिप बिराजदार यांनी देखील मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या या कामाचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे. तसेच भविष्यात देखील कोरोनाचा शिरकाव गावात होणारच नाही यासाठी देखील उपाय योजना करण्यात येत आहेत.

चौकट….

गावात कॉरंटाईन सेंटर तयार; शासनाच्या आदेशाची प्रतिक्षा
जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याचे पाहून मौजपुरी येथे दि. 21 एप्रिल 2021 रोजी लक्ष्मीबाई माध्यमिक शाळेच्या 4 खोल्या तर जि.प. शाळेच्या 3 खोल्या ताब्यात घेऊन कॉरंटाईन सेंटरसाठी राखीव ठेवल्या आहेत. त्या ठिकाणी जेवन, पाणी, फॅन आदी सुविधा देण्यात येणार आहेत. सदरील कॉरंटाईन सेंटरची सुविधा उपलब्ध करतांना सरपंच सौ. ज्योतीताई भागवत राऊत, उप सरपंच आप्पासाहेब डोंगरे, ग्रामविकास अधिकारी प्रविण पवार, उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ. करुणाताई मोरे, शाळेचे व्यवस्थापकीय क्लार्क सर्जेराव डोंगरे, सौ. मनिषा डोंगरे, भागवत राऊत, बालाजी बळप, अच्युत मोरे, बबन मोरे यांच्यासह प्रतिष्ठीत नागरीकांची उपस्थिती होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button