डिजिटल कार्यशाळा
महिलांसाठी डिजिटल साक्षरता विषयक प्रशिक्षण कार्यशाळा
ज्ञानेश्वर जुमनाके
महाराष्ट्र राज्य महिला आयोग,मुंबई व किसान मित्र ग्रामीण विकास संस्था, नेरी ता.चिमूर जि.चंद्रपूर* यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय डिजिटल कार्यशाळा संपन्न
महिलांसाठी डिजिटल साक्षरता विषयक प्रशिक्षण कार्यशाळा दिनांक :27 जानेवारी2020 रोज सोमवारला दुपारी 11:00 ते 4:00 पर्यन्त गुरुदेव सेवा मंडळ सभागृह नेरी येथे घेण्यात आला.या कार्यशाळेत उदघाटीका महीला आयोगाच्या विदर्भ सदयक्ष मा.अनुसयाताई गुप्ता तर अध्यक्ष मा.प्रा.राम राऊत सर माजी प्राचार्य जनता महाविद्यालय नेरी,प्रमुख पाहुणे मा.अर्चनाताई डोंगरे प्राचार्य सरस्वती कन्या महाविद्यालय नेरी, मा.मनोजभाऊ मामीडवार जि.परिषद सदयक्ष चंद्रपूर, मा.पुरुषोत्तम वाळके अध्यक्ष किसान मित्र संस्था नेरी ईत्यादी मान्यवर उपस्थित होते तर कार्यशाळा कार्यशाळेची सुरुवात पार्थना गीतांनि करण्यात आली.या कार्यशाळे ला प्रशिक्षक महाराष्ट्र महिला आयोग, मुंबईद्वारे नेमलेले प्रशिक्षक श्री.अनिल येवले यांनी या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या महिलांना डिजिटल साक्षरता बँकिंग व सुरक्षितते संदर्भात मदत करणाऱ्या शासकीय अॅप, महिलांसाठी असणाऱ्या शासकीय योजनां ची माहितीची अॅप हाताळणे इत्यादी विषयक प्रशिक्षण देण्यात आले, कार्यशाळेत डिजिटल साक्षरता विषयी महिलाना काही कृती करून दाखविण्यात आली.या प्रसंगी मा.अनुसयाताई गुप्ता, मा.अर्चनाताई डोंगरे, मा.राम राऊत सर, मा.मनोजभाऊ मामीडवार यांनी मार्गदर्शन केले.तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरुषोत्तम वाळके यांनी केले तर सूत्रसंचालन नितेश ढोक व आभारप्रदर्शन नाना कामडी यांनी केले ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम किशोर पोहीणकर,सचिन वरखेडे, ज्योत्स्ना नंदनवार,अनुराधा बोरकर,निकिता भैसारे,शीतल सोरदे यांनी घेतले.या कार्यशाळा कार्यशाळेला विविध गांवा मधुन 250 ते 300 महिलां सहभागी झाल्या होत्या.






