Surgana

सुरगाणा तहसीलवर कॉ जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली लाल वादळाचा झंझावात………

सुरगाणा तहसीलवर कॉ जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली लाल वादळाचा झंझावात………विजय कानडेआज दि 7 सप्टेंबर 2020 रोजी सुरगाणा कळवण मतदार संघाचे मा.आमदार कॉ जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली किसान सभेचा जनतेच्या विविध मागण्या संदर्भात सुरगाणा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. कोरोना संकट असल्याने सोसियल डिस्टन्सिंग चे नियम पाळत किसानसभेचे पदाधिकारी व लढाऊ मोर्चेकरी मार्किंग केलेल्या जागेवर बसुन आपल्या मागण्या सोडविण्यासाठी तहसील कार्यालयास आवाहन करीत होते. तालुक्यातील अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न कॉ गावित साहेबांनी आणि किसान सभेने हाती घेतल्याने तालुक्यातील 15 ते 16 हजाराच्या जवळपास जनसमुदाय मोर्च्याला पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाला होता. गेल्या सहा महीन्यापासुन कोरोना संसर्ग काळात सुरगाणा तालुक्यातील जनतेला शासनाच्या दुर्लक्ष पणामुळे , अंदा धुंदी आणि मनमानी कारभारामुळे, केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकप्रतिनिधीनी तालुक्यातील जनतेच्या समश्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे जनतेला अनेक समस्याना समोरे जावे लागत आहे. जनतेला मरणाच्या दारात लोटणारया कारभाराने जनता त्रस्त ज़ाली होती. अशा परिस्थितीत सुरगाणा तालुका किसान सभा पदाधिकारी आणि कॉ जे पी गावित यांनी गेल्या 15 दिवसापासून सबंध तालुक्यातील जनतेच्या विविध समश्याचा आढावा घेत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी अंदोलन छेडन्याचा निर्धार केला.अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न हाती घेतल्याने सुरगाणा शहरात लाल वादळाचा झंझावत दिसत होता. सुरगाणा शहरात भव्य शक्ती प्रदर्शन झाल्यानंतर माकपा सेक्रेटरी कॉ सुभाष चौधरी यांनी मोर्चाचे प्रास्ताविक करतांना जनतेच्या समस्या आणि जिव्हाळ्याचे जीवनावश्यक प्रश्न सोडविण्यासाठी लाल झेंडयाच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊण प्रत्यक प्रश्नावर लढा देणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.
कॉ जे पी गावीत यांनी मोर्चची सूत्रे हाती घेत शासनाच्या अंधाधुंदी आणि भोंगळ कारभाराचा आणि पदासाठी मते मागुन जनतेची फसवणूक करुन जनतेला वाळीत टाकणारया विरोधकांचा सीपीएम स्टाईलने आक्रमक होत चांगलाच समाचार घेतला. विविध खात्याच्या प्रशासकीय आधिकार्यांच्या तालुक्यात चाललेल्या अन्याय कारक, आणि मनमानी कारभाराची माहिती जनसमुदायला स्पष्ट करुण सांगतांना अधिकारी आपल्या विकासाच्या योजना कशा रखडवतात , कसे वंचित ठेवतात, कशी उडवा उडवी ची उत्तरे देतात, याविषयी जागृती करीत मोर्चाच्या एकेक मागण्या उपस्थीत जनतेला समजावून सांगितल्या.राज्यपाल महोदयांच्या आदेशानुसार 30 सप्टेंबर 2020 पर्यंत प्रलंबित असलेले, अपात्र ठरविलेले, कसत असलेल्या क्षेत्रपेक्षा कमी क्षेत्र दिलेल्याना कसत असलेला पुर्ण वनपट्टा द्याव , नविन वन पट्टायाना मंजुरी द्यावी असे सर्व वनदावे निकाली काढावेत. अन्यथा पुढील ऑगस्ट महिन्यात मोठे आंदोलन छेडन्याचा इशारा दिला. यावेळे बोरगाव उंबरठाण बार्हे बिटाचे वनाधिकारी यांना जनसमुदायसमोर विचारणा केली.कोरोना संकट काळात रेशन धान्य वाटप करतांना गरजू लोकांना का रेशन दिले नाही,रेशन कार्ड नसलेल्यांना कोरोना काळात धान्य देणे गरजेचे होते पन कुठे वाटप केले, कुनाला धान्य वाटप केले त्याच्या याद्या आम्हाला दाखवा असी विचारणा केली.
आज सुरगाणा तालुक्यात रेशन कार्ड चा गंभीर प्रश्न आहे. आज तालुक्यातील असंख्य युवक सांसारीक जीवन जगत आहेत पण त्यांना घरकुलाचा लाभ घेता येत नाही. रेशन कार्ड नसल्याने घर मिळण्यास अडचणी येत आहेत. ड यादीत प्रत्यक गरजू कुटुंब समाविष्ट करून त्याला घरकुलचा लाभ द्यावा. स्वतंत्र रेशन कार्ड द्या अन्यथा आमचा युवक शासनाला सळो की पळो केल्याशिवाय सोडणार नाही. तालुक्यात बोगस रेशन कार्ड वाटप चा काळ उपक्रम थांबवा अन्यथा परिणाम भोगावा लागेल. कागदपत्र न जमा करता,पडताळणी न करता रेशन कार्ड कसे वाटप केले. कोणत्या निकशावार आधारीत डोळे झाकुन बोगस रेशन कार्ड दिले याची उत्तरे जनतेला द्यावीत, गरजूनी कागदपत्रे पुर्ण दिल्यास कोणताही विलंब न लावता नविन रेशन कार्ड लवकर द्यावीत, काही जीर्ण झालेली जुनी रेशन कार्ड बदलून द्यावित, विभक्त रेशन कार्ड त्वरित द्यावेत , यामुळे अनेक योजना पासुन नागरिक वंचित राहतो याची दखल प्रशासनाने घ्यावी. नियमानुसार 55 रुपयात मिळ्णार्या रेशन कार्ड साठी काही सामज कंटक दलाल 500 रुपये घेउन गरिब, अदीवासी शेतकरी शेतमजुर कामगार जनतेची लूट करतायत हे कदापी खपवून घेतले जाणार नाही. यापुढे आमचे नागरिक,तरुण, युवक ,युवती अशा लुटारू, समाजातील विषारी सापांना ठेचल्याशीवय राहणार नाही,हा लुटारू प्रकार सहन करणार नाही,
आजच्या कोरोना सारख्या कठिण काळात नागरीकास रोजगार उपलब्ध करुन देणे जास्त गरजेचे आहे, या परिस्थितीत रोजगारासाठी बाहेर जाणारी व्यक्ती आज जीव धोक्यात घालुन बाहेर जात आहे. बाहेर जाणार्या व्यक्तीला जर कोरोना ची लागण ज़ाली तर ते त्याच्या कुटुंबाला,त्याच्या गावाला आणि तालुक्याला परवडणारे नाही, आज तालुक्यात कोरोना येणे आमच्या जनतेला परवडणारे नाही. म्हणूण रोजगार हमी योजना त्वरित सूरु करुन तालुक्यातच जनतेला रोजगार देण्याचे नियोजन तहसीलदार बी डी ओ यानी करावे.वृधाप्कळ निराधार पेन्शन योजनेची प्रलंबित असलेली प्रकरणे त्वरित निकली काढा, त्यंना दरमहा 2500 रु द्यावेत, मनरेगात किमान 200 दिवस काम द्यावे, पीएम फंड चे पैसे त्वरीत शेतकरी वर्गाला द्यावेत. आदीवासी बांधवांना मागिल खावटी माफ करुन नविन खावटी 5000 रु द्यावी,
पावसाने अंतर दिल्याने तालुक्यातील शेतीची खुप नुकसान ज़ाली आहे,उत्पन्न येणारच नाही अशी कठिण परिस्थिती आहे त्यामूळे संपूर्ण तालुका संभाव्य दुष्काळी यादीत समाविष्ठ करा असे कॉ जे पी गावित सांगितले.तालुक्यातील शिक्षण व्यवस्था कोरोनामुळे कठिण बनली आहे, आज एका पिढीचे नुकसान होत आहे यावर त्वरित तोड्गा काढून ग्रामीण भागातील शाळकरी महाविध्यालयींन तसेच उच्च शिक्षण क्षेत्रात शिक्षण घेणारया तालुक्यातील विद्यार्थीयांचे मोठे नुकसान होत आहे यावर त्वरित तोडगा काढून ऑनलाइन शिक्षण बाबद पर्याय शोधून त्वरित ही नुकसान थांबवावी असी सुचना तहसीलदार साहेबांना केली.मोबाईल रेंज साठीचे टॉवर उभे केलेत ते त्वरित सुरु करावेत.त्याचा उपयोग ऑनलाइन अभ्यासासाठी होइल. म्हणूण यावरही लक्ष देण्याच्या सुचना सबंधीत अधिकारी वर्गास केल्या..
विजेचे घराचे अवाढव्य बिल, पाण्याच्या मोटरिचे बिल कोणताही वापर नसतांनाही का दिले जाते? रीडिंग न घेता बिले आकारली जातात यावर लक्ष द्यावे, चुकीच्या पध्दतीने दिलेली वाढीव बिले त्वरित कमी करुन द्या अन्यथा mseb वर मोर्च्या येइल याची दखल घ्यावी असेही अधिकार्यास सांगितले…यावेळी कॉ गावित साहेबांनी वनजमिन ,रेशन , रोजगार,शिक्षण, खावटी , पेन्सेन, घरकुल, महवितरण. त्र आरोग्य,रस्ते, कृषी विभाग, या सर्व क्षत्रातील पदाधिकारी ,तहसिलदार, बिडीओ , वरिष्ठ पोलिस अधिकारी या सर्वांना कॉ गावित साहेबांनी विनंती करुन मोर्चसमोर बोलावून घेतले आणि मोर्चतील प्रश्न कसे आणि कधि सोडविणार याविषयी त्यांच्याच तोंडून वदवुन घेतले. जनतेला अश्वासने दिली आहेत यात जर दुर्लक्ष किवा टाळाटाळ केली तर पुढील आंदोलनात जनता आक्रमक रुप धारण करुन कठोर आणि आक्रमक लढा उभारेल अशी सुचना कॉ गावित साहेबांनी तहसीलदार साहेबांना सांगितले…..या आंदोलनात सर्वच प्रश्न जिव्हाळ्याचे असल्यामूळे तरुण तरुणी युवक युवती शालेय विध्यर्थी यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता, तसेच जेष्ठ नागरिक, महिला, व्यापारी,व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माकप चे तालुका जिल्हा कमिटी सद्श्य, किसान सभा,DYFI संघटना, sfi संघटना, जणवादी महिला संघटना, या सर्वांन्चा या मोर्चास पाठिंबा होता . यावेळी , सभापती कॉ मनिषा महाले, उपसभापती कॉ इंद्रजित गावित, कॉ सावळीराम पवार रामजी गावित विजय घागळे, कलाबाई भोये, जनर्दन भोये, सुरेश गवळी वसंत बागुल, धर्मेंद्र पगरिया, मेनका पवार, अरुणा गावित भारती चौधरी, आनंदा चौधरी, सुरगाणा नगर पंचायत पदाधिकारी, तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, बोरगाव, हट्टी, भोरमाळ, भवाडा, गोन्दूने , पळसण या गणातील माकप चे खंदे कार्यकर्ते व नागरिक उपस्थीत होते…..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button