Dewala

खामखेडा येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

खामखेडा येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

महेश शिरोरे।

देवळा तालुक्यातील खामखेडा येथे ग्रामपंचायत व आमदार निधीतून तयार झालेल्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आमदार डॉ राहुल आहेर, माजी जि प सदस्य केदा आहेर,सरपंच संजय मोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
खामखेडा येथे आमदार निधीतल्या जनसुविधा अंतर्गत स्मशानभूमी शेड व लायकेश्वर महादेव मंदिरातील २५\१५ योजनेतुन सभागृह तसेच चौदाव्या वित्त आयोग योजनेतुन खामखेडा येथील विष्णू पंचायतन मंदिरापासून ते गिरणा नदी काठापर्यंत तयार करण्यात आलेल्या काँक्रिटीकरण तसेच खामखेडा येथील स्थळ आदिवासी वस्तीवरील सौरदुहेरीपंप पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी लायकेश्वर मंदिरातील सभागृहात झालेल्या बैठकीत सुळेडावा कालव्याच्या विस्तारीकरण व वहनक्षमता वाढीसाठी ग्रामस्थांच्या मागणीचा कडवा धरण उपविभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील या संदर्भात चर्चा करत अधिकाऱ्यांना यावेळी सूचना केल्या.
त्याचबरोबर पुढील काळात देखील गावासाठी आवश्यक कामांसाठी सहकार्याची भूमिका राहील असे आ डाॅ राहुल आहेर यांनी सांगितले.
पुढील काळात गावशिवारातील सर्व पानंद रस्त्यांसाठी खडीकरण तसेच विस्तारीकरणासाठी प्रयत्न करू असे माजी जि प सदस्य केदा नाना आहेर यांनी सांगितले.

आण्णा पाटील यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमास सरपंच संजय मोरे,उखड्याबाई पवार,माजी सरपंच ,बाप्पू शेवाळे,वसाकाचे माजी संचालक आण्णा पाटील,सुनील शेवाळे,विश्वास शेवाळे,विजय सूर्यवंशी,दीपक मोरे,समाधान आहेर,दादाजी बोरसे,विविध सेवा सोसायटीचे चेअरमन अभिमन शेवाळे,नामदेव बच्छाव,गोरख शेवाळे,गुलाब शेवाळे,रमेश मोरे ,दिलीप आहेर,भाऊसाहेब पगार,महेंद्र हिरे,धनराज शेवाळे,दत्तू हिरे,सुभाष शेवाळे ,ग्रामविकास अधिकारी व्ही बी सोळसे,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button