अवैध वाळू साठा केल्या प्रकरणी परंडा तालूक्यातील रुई येथिल दोघावर लाखो रुपयांची दंडात्मक कारवाई .अवैध वाळू साठा करणाऱ्यात खळबळ
परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे
अनधिकृत वाळू उत्खनन व साठा करणाऱ्या परंडा तालूक्यातील रूई येथिल जयसिंग लिमकर यांना ११ लाख ५४ हजार २०० रुपयाची तर रणधीर मुळीक यांना ६ लाख ६८ हजार २५० रुपयाची दंडात्मक कारवाई उपविभागीय आधिकारी भुम यांच्या आदेशाने परंडा महसुल विभागाने केली असुन नोटीस जारी करण्यात आली आहे या मुळ अवैध वाळू साठा करणाऱ्यांत खळबळ उडाली आहे
या बाबत उपविभागीय अधिकारी भूम यांनी परंडा तालूक्यातील खासापुरी शिवारात दिनांक 25 जुलै रोजी भेट दिली असता कचरे यांचे घराशेजारी अवैध वाळू चे ८ ब्रास साठा तर शहाजी बापू यांच्या बंगल्या पाठीमागे २० ब्रास तसेच हरी लिमकर यांचे घराशेजारी १० ब्रास अशी एकूण 38 ब्रास विनापरवाना वाळू साठवणूक केल्याचे आढळुन आले होते .
या प्रकरणी उपविभागीय आधिकारी यांनी चौकशी केली असता सदरील वाळू साठा जयसिंग भुजंग निमकर यांनी केल्याचे आढळुन आले .
तर रुई येथिल रणधीर मुळीक यांनी २२ ब्रास अवैध वाळू साठा केल्याचे आढळुन आल्याने त्यांच्यावर ६ लाख ६८ हजार २५० रुपयांची दंडात्मक कारवाई करून नोटीस देण्यात आली असुन
सबंधीतावर कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय आधिकारी भुम यांनी तहसिलदार यांना दिल्याने
तहसिलदार अनिल कुमार हेळकर यांनी दोघांना नोटीसा दिल्या आहे .
दिलेल्या नोटीसी मध्ये म्हटले आहे की आपण अनधिकृतपणे वाळू साठा केल्याने आपल्या विरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ पोटकलम ८ , १, २ आणि महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब दिनांक १२ जानेवारी २०१८ मधील परीच्छेद ८९ व ९२ मधील तरतुदी नुसार कारवाईस पात्र असून खालील प्रमाणे दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासाही नोटीस प्राप्त झाल्यापासून तीन दिवसात सादर करावा मुदतीत खुलासा सादर न केल्यास आपणास आकारण्यात आलेली दंडाची रक्कम मान्य आहे असे गृहीत धरून आपणा विरुद्ध नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात .
असा इशारा देण्यात आला आहे , महसुल विभाग पुढे काय करतात या कडे तालूक्याचे लक्ष लागले आहे.






