Surgana

रेशनची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा चिराई घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने वळणावर अपघात.चालक किरकोळ जखमी

रेशनची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा चिराई घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने वळणावर अपघात.चालक किरकोळ जखमी

विजय कानडे

तालुक्यात रेशनच्या धान्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा बुबळी जवळील चिराई घाटातील यू टर्न वळणावर दुपारी एक ते दीड वाजेच्या दरम्यान पावसाची रिपरिप सुरु असतांना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असून ट्रक नं सी.जी- 07 बी.के.7144 हा ट्रक रस्ताच्या कडेला मातीच्या भरावावर ढिगाला जाऊन धडकल्याने चालक यशवंत कुमार राजकुमार धृरु वय 25 रा.सामोरा ता.बागबहास जि. महासमुंद राज्य छत्तीसगढ हा किरकोळ जखमी झाला असून त्याच्या पायाला, हाताला दु:खापत झाली आहे.
ट्रकची पुढील चाके जागेवर निखळून पडली असून चालकाच्या कॅबीनचे नुकसान झाले आहे.

ट्रकचा अपघात झाला हे समजताच तालुका पुरवठा अधिकारी उल्हास टर्ले यांनी सहायक पोलिस निरीक्षक सागर नांद्रे यांना ताबडतोब कळवून चिराई घाटात धाव घेतली.चालकास तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.पाऊस सुरु असल्याने धान्य झाकण्याकरीता गोदामातून तात्काळ ताडपत्रींची व्यवस्था करण्यात आली असुन रेशनचा गहू व तांदूळ याची वाहतूक रात्री उशिरा पर्यंत करणे सुरु होते.

” रेशन वाहतूक करणाऱ्या ट्रकचा चिराई घाटात अपघाताची बातमी समजताच तातडीने घटनास्थळी धाव घेवून धान्य पावसात भिजणार नाही याची काळजी घेतली आहे. ट्रकमध्ये तीस टन माल भरलेला होता अंदाजे दहा ते बारा क्विंटल धान्य पावसात भिजून खराब झाले आहे.त्यामुळे सदर माल ठेकेदारास परत करण्यात येईल.”
उल्हास टर्ले
तालुका पुरवठा अधिकारी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button