Pandharpur

अडचणीतील कुुंभार समाजाला मनसेची मदत

अडचणीतील कुुंभार समाजाला मनसेची मदत

प्रतिनिधी रफिक आतार

पंढरपूर शहरांमधील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लाॅकडाऊन जाहीर कऱण्यात आला आहे. या लाॅकडाऊनमुळे अनेक छोटे मोठे व्यवसाय बंद झाले आहेत. हातकलेवर आपला उरर्निवाह करणारा कुंभार समाज देखील कोरोनामुळे अडचणीत आला आहे. ऐन उन्हाळ्यात माठाची विक्री ठप्प असल्याने सध्या कुंभारवाड्यातील अर्थिक चक्र देखील जागच्या जागी थांबले आहे. या पार्श्वभूमीवर अडचणीतील कुंभार समाजाला आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या वतीने मदत करण्यात आली. नगरसेवक लखन चौगुले यांच्या हस्ते कुंभार समाजातील गरीब व गरजू लोकांना धान्याचे वाटप केले.गेल्या महिन्याभरापासून सर्वत्र लाॅकडाऊन आहे. याचा कुंभार व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. दवर्षी येथील कुंभार गरीबाचा फ्रिज असलेले माठ तयार करतात. परंतु ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर कोरोनाचे संकट आल्याने लाखो रुपयांचे माठ कुंभारवाड्यात विक्री विना पडून आहेत. त्यामुळे कुंभारवाड्यातील आर्थिक चक्र देखील थांबले आहे. हातकलेवर आपला प्रपंच चालवणारे येथील अनेक कुंभार कुटुंब अडचणीत आली आहेत. ही बाब मनसेेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या लक्षात येताच त्यांनी कुंभार समाजातील गरीब व गरजू लोकांना गहू, तांदुळ, साखर,चहा पावडर आदीसह मास्कचे वाटप केले.ऐन संकटाच्या काळात कुंभार समाजाच्या मदतीला दिलीप धोत्रे धावून आल्याची भावना येथील कुंभार समाजातील लोकांनी व्यक्त केली. यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड, उपप्रमुख महेश पवार, अर्जून जाधव, कुंभार समाजाचे नेेते यशवंत कुंभार,ओंकार कुलकर्णी,रवी शिंदे, समाधान डुबल आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button