Bhusawal

नाहाटा महाविद्यालयात कवी ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली अर्पण

नाहाटा महाविद्यालयात कवी ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली अर्पण

फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल

भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभागातर्फे खानदेश नव्हे तर महाराष्ट्राचे ख्यातनाम निसर्गकवी, रानकवी . ना.धों. महानोर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ना. धों. महानोर यांनी मराठी साहित्यात काव्य, कादंबरी, कथा, ललित, शेतीविषयक, चित्रपट गीतलेखन केलेले आहे. श्रद्धांजली कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस व्ही पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. बी.एच. ब-हाटे, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए.डी गोस्वामी उपस्थित होते. मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. जे एफ.पाटील यांनी ना. धों. महानोर यांच्या जीवन व साहित्य कार्याचा थोडक्यात परिचय करून दिला. त्यांचे काव्य शेती, माती, निसर्ग आणि मानवी भावना व्यक्त करणारे होते. याप्रसंगी श्रद्धांजलीपर मनोगतात जेष्ठ प्रा. डॉ. के. के. अहिरे यांनी महानोरांच्या जीवनातील काही प्रसंग सांगितले. प्रा. डॉ. एस. पी. झनके यांनी ना. धों. महानोरांच्या काव्याची तुलना इंग्रजी कवी पी. बी शेली आणि रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्याशी केली. सूत्रसंचालन व आभार प्रा. पुरुषोत्तम महाजन यांनी केले. श्रद्धांजलीपर कार्यक्रमास प्रा. डॉ. एस.टी. धूम, प्रा. डॉ. किरण वारके, प्रा. विलास सोळुंके, प्रा. डॉ. डी. एम.टेकाडे, डॉ. आर.एस नाडेकर, प्रा. साहेबराव राठोड, डॉ.अनिल हिवाळे,डॉ. स्वाती महाजन, डॉ. दीनानाथ पाठक. प्रा. गौतम भालेराव, डॉ.नीनू झोपे, डॉ. विठ्ठल केंद्रे, प्रा. कौस्तुभ पाटे, डॉ. मनोज पाटील, डॉ. आर.बी. तायडे, डॉ. सचिन राजपूत, प्रा. श्रीपाद वाणी, प्रा.डॉ. रश्मी शर्मा, प्रा. डॉ. ममताबेन पाटील, प्रा. प्रतिभा गलवाडे,प्रा. अक्षरा साबळे, प्रा. शितल सोनवणे, प्रा. शलाका निकम, प्रा. शिवानी माळी, डॉ. प्रियंका महाजन, प्रा. कविता पांडव उपस्थित होत्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button