पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी यांनी मंगळवेढा येथील मजुरांना गावी जाण्यासाठी स्वखर्चाने केली मदत
रफिक आतार
मंगळवेढा तालुक्यातील एका खेड्यात कोळसा तयार करण्याचे काम रामदास हिलम व सोमनाथ घोगरे यांचे कुटुंब करत होते लॉकडाऊन झाल्या नंतर ज्या मालकाकडे काम करीत होते त्या मालकाने त्यांना कामावरून काढून टाकले लॉक डाऊन काळात त्यांना अन्न धान्य किंवा 2 वेळ जेवणाची व्यवस्था केली नाही त्यामुळे या कुटुंबाने दोन महिने आजूबाजूला मागून खात दिवस काढले काही लोकांनी मदत ही केली पण हे लोक शेवटी मदत किती दिवस करणार मदत बंद झाली त्यामुळे त्यांचेवर उपासमारीची वेळ आली त्यामुळे त्या कुटुंबाने पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला हे दोन कुटुंब आपल्या पाच लहान मुले सह तोडकमोडका संसार घेऊन मंगळवेढा वरून कामशेतला चालत निघाले चोवीस तास चालल्या नंतर ते पंढरपूर ला सकाळी पोहचले. याच वेळी पंढरपूर नगरपरिषद चे आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे हे त्या भागात कोरोना प्रतिबंधात्मक केलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले असता रेल्वे रुळावरून पुण्याला कामशेत ला जायला चालत निघालेल्या कुटुंब व पाय ओढत रडत चालणारी लहान मुलाचे पावले बघून शरद वाघमारे यांना वाईट वाटले त्यांनी लगेच उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर यांचे शी संपर्क साधला आणि त्यांची परिस्थिती सांगितली त्यावर उपमुख्याधिकारी यांनी रुग्णवाहिका बोलवून तपासणी करून त्यांना तनपुरे मठात क्वारणटाईन करा व या कुटुंबाला सगळी मदत करा असे सांगितले शरद वाघमारे यांनी त्वरित रुग्णवाहिका बोलवून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करून तनपुरे मठात ठेवले आणि रॉबिन हूड चे कार्यकर्ते कडून त्यांचा जेवणाची सोय केली तसेच नगरपरिषद चे मुख्यआधिकारी अनिकेत मानोरकर यांना झालेल्या घटनांची माहिती दिली त्यावर मुख्यआधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी सचिन ढोले साहेब यांचेशी चर्चा करून सदर कुटुंबास कामशेत पुणे येथे जाण्यासाठी वाहन परवाना मिळवून दिला पण त्या कुटुंबाकडे जाणाऱ्या वाहन चे भाडे देण्यासाठी पैसे नव्हते त्यामुळे शरद वाघमारे यांनी आपले सहकारी आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकर व मुकादम अनिल गोयल ,दत्ता चंदनशिवे , अप्पा माने ,राम खरात ,राम सर्वगोड व सफाई कर्मचारी यांचे शी चर्चा करून लगेच वर्गणी गोळा करून रु 6400 जमविले आणि खाजगी वाहनातून त्या कुटुंबाला त्यांचे गावी पोहचविले जेव्हा हे सगळे कुटुंब सुखरूप गावी पोहोचले व त्यांनी शरद वाघमारे यांना फोन करून नगरपरिषद कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्य बद्दल आभार व्यक्त केले यावेळी बोलताना उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर यांनी सांगितले की,आपण नेहमी देव शोधत असतो पण खरा देव माणसातच आहे याची प्रचिती आली शरद वाघमारे व कर्मचाऱ्यांच्या रूपाने त्या कुटुंबाला देव च भेटला
जे का रंजले गांजले ।त्यासी म्हणे जो आपूला तोचि साधू ओळखावा । देव तेथेचि जाणावा
हा संत तुकाराम महाराज यांचा अभंग खऱ्या अर्थाने सार्थक झाला आशा भावना व्यक्त केल्या.






