Pandharpur

सायकल चालवा निरोगी राहा प्रांताधिकारी सचिन ढोले जागतिक सायकल दिन पंढरपूरमध्ये उत्साहात साजरा

सायकल चालवा निरोगी राहा प्रांताधिकारी सचिन ढोले जागतिक सायकल दिन पंढरपूरमध्ये उत्साहात साजरा

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर सायकल चालविणे हा व्यायाम पर्यावरण पूरक आहे यामुळे इंधन बचत तर होतेच शिवाय प्रदूषण कमी होते त्यामुळे सायकल चालवा आणि निरोगी राहा असा मंत्र प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिला. जागतिक सायकल दिन व पंढरपूर सायकल क्लबचा तिसरा वर्धापन श्री ढोले यांचे उपस्थितीत वृक्ष वाटप उत्साहात साजरा करण्यात आला. तीन वर्षांपूर्वी महेश भोसले यांच्या संकल्पनेतून पंढरपूर सायकल क्लबची स्थापना करण्यात आली. स्थापने प्रसंगी बोटावर मोजण्याऐवढे सदस्य संख्या असलेल्या या क्लबने आता एक हजारचा टप्पा पार केला आहे.
या क्लबच्या माध्यमातून सायकल चालविण्याचे फायदे सांगून सायकल चालविण्यास प्रोत्साहित केले जाते.आज असलेल्या जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून पंत नगरी येथे घेण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात श्री ढोले यांच्या उपस्थितीत वड, पिंपळ या झाडांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विठ्ठल पाटील, सुनील उंबरे, विलास जोशी, प्रशांत मोरे, संतोष पाटोळे, दिगंबर भोसले, सतीश चंद्रराव, रेखा चंद्रराव, प्रकाश शेटे, मंगेश परिचारक, विष्णुपंत गावडे, सुरेश पाटील आदी सायकल क्लबचे सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button