Akkalkot

कोरोना महामारीसाठी तात्काळ निधी देणार : खा.डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामींनी कोरोना महामारीचा घेतला आढावा

कोरोना महामारीसाठी तात्काळ निधी देणार : खा.डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामींनी कोरोना महामारीचा घेतला आढावा

कृष्णा यादव, प्रतिनिधी, अक्कलकोट, दि.27 :

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांची खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी ‌यांनी भेट घेतली. कोरोना महामारीच्या संदर्भात आढावा घेतला खासदार स्थानिक विकास निधीअंतर्गत कोणासाठी मोठी मदत तात्काळ देण्याचे सांगून या परिस्थितीत आवश्यक ती साधनसामुग्री खरेदी करावी असेही यावेळी सांगितले.
तसेच सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये असणारी परिस्थिती लोकांमध्ये जनजागृती व आवश्यक ती काळजी घेण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. तरीसुद्धा लोकांमध्ये अधिकाधिक जागृती बाळगण्यासाठी मी सुद्धा आव्हान करीत आहे.
या परिस्थितीत पशुखाद्य भाजीपाला अशा अत्यावश्यक गोष्टींसाठी सहाय्य व्हावे. लोक आठवडा बाजार निमित्त बाजारपेठांमध्ये झुंबड गर्दी करत आहेत. ही गर्दी टाळण्यासाठी सर्वतोपरी आणखी प्रयत्न व उपाय योजना कराव्यात अशा सूचना केल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button