Shindkgeda

मुडावद येथे पांझरा नदीवरील पुलाच्या पुढे जाण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून लवकरात लवकर रस्ता तयार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही  शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे

मुडावद येथे पांझरा नदीवरील पुलाच्या पुढे जाण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून लवकरात लवकर रस्ता तयार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे

असद खाटीक

मुडावद तालुका शिंदखेडा येथील तापी व पांझरा नदीच्या संगमावर ५०० वर्ष जुने श्री कपिलेश्वर महादेव मंदिर आहे या मंदीरात जाण्यासाठी भावीकाना खुप त्रास होत असल्यामुळे पांझरा नदीवरील ५ कोटी रुपयाचा पूल बांधकाम करून ३ वर्ष होत आले परंतु पुलाच्या पुढे जाण्यासाठी श्री क्षेत्र कुणकेश्वर महादेव मंदिर वर जाण्यासाठी रस्ताच नसल्याने पुलाचा वापर होत नाही व शासनाच्या ५ कोटी रुपयांचा पुल बांधकाम करून काही उपयोगच नाही हा पुल बांधकाम करताना ठेकेदाराने त्या पुढचा रस्त्याचा विचारच केला नाही म्हणून सरकारच्या ५ कोटी रुपयाचा खर्च करून सर्व व्यर्थ दिसत आहे तरी भाविकांच्या , निमगाव कऱ्यांच्या त्रासाला पाहुण शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी दिनांक २६/८/२०२० रोजी महसूल बंधरे ग्रामविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री धुळे जिल्हा मा. अब्दुल सत्तार साहेब यांना निवेदन देऊन चर्चा केली की पुलापुढे रस्ता तयार झाला नाही तर पुलाचा बांधुन काही उपयोग नाही तरी आपण आपल्या स्थरावर पाठपुरावा करून लवकरात लवकर रस्ता तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा असे निवेदन दिलेल्या मुळे सरकारी कर्मचारी मुडावद येथे येऊन पुलाची व रस्त्याची पहानी केली या रसत्याचे विशेष म्हणजे हा रस्ता धुळे जिल्हा व जळगाव जिल्हा जोडला जातो धुळे ते अमळनेर बायपास रस्ता म्हणुन या रसत्याचा उपयोग केला जाऊ शकतो म्हणून आज दिनांक २६ सप्टेंबर २०२० रोजी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व विधानसभा क्षेत्र प्रमुख छोटू पाटील हे पहानी करण्यासाठी गेले त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी मुडावद येथील भाविकांना , शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना आश्र्वासन दिले की सरकार दरबारी या पुलापुढील रस्त्याचे कामांचे पाठपुरावा करुन लवकरात लवकर रस्ता तयार करुन श्री कपिलेश्वर महादेव मंदिर कडून निम गाव पर्यंत रस्ता तयार करुन धुळे ते अमळनेर बायपास रस्ता तयार केल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असे आश्र्वासन दिले त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख छोटू पाटील सह मुडावद गावातील शेतकरी, शिवसैनिक व गावकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button