Delhi

?Big Breaking… ईडीला कोळसा घोटाळ्याच्या तपासादरम्यान लाच..!कोणी किती व कसे घेतले पैसे..!

?Big Breaking… ईडीला कोळसा घोटाळ्याच्या तपासादरम्यान लाच..!कोणी किती व कसे घेतले पैसे..!

लाच रक्कम १३०० कोटी रुपयांची देण्यात आल्याचे पुरावे हाती लागले आहेत. त्यापैकी ७० कोटी रुपये विनय मिश्रा, विकास मिश्रा यांनी घेतले होते.

दिल्ली : कोळसा उत्खनन प्रकरणात ईडीच्या हाती मोठे पुरावे लागले असल्याचे वृत्त आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ईडीला कोळसा घोटाळ्याच्या तपासादरम्यान १३०० कोटी रुपयांची लाच देण्यात आल्याचे पुरावे हाती लागले आहेत. त्यापैकी ७० कोटी रुपये विनय मिश्रा, विकास मिश्रा यांनी घेतले होते. लाचेची ही रक्कम ‘वजनदार’ नेत्यांच्या नावाखाली मागण्यात आली होती.
दरम्यान लाचेची ही रक्कम कोणापर्यंत जात होती याचा शोध आता ईडी घेत आहे.

आरोपी विकासने केले खळबळजनक खुलासे
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, विकास लाचेची रक्कम संबंधितांना पोहोचविण्याचे काम करीत होता. आतापर्यंत झालेल्या चौकशीत त्याने काही टीएमसी नेते तसेच नोकरशाहांची नावे घेतली असल्याचे समजते. यासोबतच रोख रकमेशिवाय दागणे व अन्य वस्तूही लाच म्हणून घेत असल्याची कबूली त्याने दिली. विकास सध्या ६ दिवसांच्या ईडी रिमांडवर आहे. वरिष्ठ अधिकारी त्याची कसून चौकशी करीत आहे. त्याला विनय मिश्राबाबतही विचारणा करण्यात येत आहे. विकास हा विनयचा भाऊ असून विनय अभिषेक बॅनर्जींच नीकटवर्तीय आहे, जो सध्या दुबई वा बांगलादेशमध्ये असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता ईडी काही नेत्यांनाही समन्स बजावण्याची शक्यता आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button