Aurangabad

खासदार इम्तियाज जलिल यांच्यावर गुन्हा दाखल करा; चंद्रकांत खैरे यांची मागणी

खासदार इम्तियाज जलिल यांच्यावर गुन्हा दाखल करा; चंद्रकांत खैरे यांची मागणी

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांच्यासह इतर समाजकंटक त्यांचे सहकारी यांचेवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. राज्यभरात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेसह सर्वच लोकप्रतिनिधी, अधिकारी, तसेच इतर कर्मचारी जीवाचे राण करत आहे़. त्यात डेल्टा प्लसची तिसरी लाट भविष्यात उसळण्याची शक्यता वर्तवली जात असताना, राज्य शासनाच्या आदेशावरुन जिल्ह्यात लावण्यात आलेल्या विकेंड लॉकडाऊन मध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून ान-ए-इम्तियाज” हा कव्वालीचा कार्यक्रम दौलताबाद परिसरात शनिवार रोजी आयोजित केला.

त्यात त्यांच्या काही समाजकंटकांनी पैशाच्या नोटांची उधळन करुन मध्यरात्री पर्यंत कार्यक्रम करुन नियमाची पायमल्ली केली, ही बाब अत्यंत गंभीर आहे़. असे चंद्रकांत खैरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून नियमांना केराची टोेपली दाखविली आहे़. खासदार इम्तियाज जलील व त्या ठिकाणी जमलेल्या समाजकंटकांवर त्वरीत गुंन्हे दाखल करण्यात यावे, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी लॉकडाऊन काळात वेळोवेळी कायदे मोडले आहेत.

३ जुलेरोजी दौलताबाद जवळील अंबर फार्म हाऊस ही जागा कोणाच्या मालकीची आहे, त्याची महसूल विभागाकडून माहिती घेण्यात यावी, व या जागेचे मालक यांचेवर सुध्दा कार्यवाही करण्यात यावी. तसेच इम्तियाज जलील यांनी आतापर्यंत लॉकडाऊनमध्ये वेळोवेळी कायदा व सुव्यवस्था मोडलेली असतांना त्यांचेवर अनेक गुन्हे पोलीस विभागाने दाखल केलेले आहेत, याची संपूर्ण माहिती, आपण गृह मंत्रालय, महाराष्ट्र शासनास देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे़.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button