प्रभाग क्रमांक पाचमध्ये आमदार प्रशांतराव परिचारक यांचे हस्ते क्रॉकिंकरणाचा शुभारंभ
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषदेच्या नगरोत्थान विकासकामा अंर्तगत हरिदास वेस, कवठेकर गल्ली, अर्बन महिला शाखा रोड या परिसरातील क्रॉकिंटकरणाच्या कामाचा शुभारंभ सोलापूर जिल्हयाचे आमदार मा.प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते व नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले व मंदिर समितीचे माजी सद्स्य पांडुरंग परिवाराचे जेष्ठ नेते ह.भ.प श्री मदन महाराज हरिदास यांचे प्रमूख उपस्थितीत करण्यात आले. नगर परिषदेने यात्रा अनुदानाचा वापर शहरातील प्रदक्षिणा मार्गाचे पूर्ण क्रॉकिंटिकीरण करण्यासाठी मान्यता घेतल्याने आता मंदिर परिसरातील भाविकांची जास्त वर्दळ असल्याने अंर्तगत रस्ते सुद्धा चांगल्या दर्जाचे टिकावू करावेत अशी सूचना आमदार प्रशांतराव परिचारक यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभागाचे नगरसेवक अनिल अभंगराव यांनी व स्वागत नगरसेविका श्रीमती सुप्रिया ताई डांगे यांनी केले. कार्यक्रमास उपनगराध्यक्षा सौ श्वेता डोंबे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट, माजी उपनगराध्यक्ष नागेशकाका भोसले, माजी नगरसेवक हरिभाऊ डांगे, अर्बन बँकेचे संचालक पांडुरंग घंटी, हरिष ताठे, विनायक महाराज हरिदास, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर,बांधकाम समिती सभापती सुरेश नेहतराव, विक्रम शिरसट, नरेंद्र डांगे, नगरसेवक विवेक परदेशी, इब्राहिम बोहरी, सुजित सर्वगोड, जगदिश जोजारे, शिवाजी अंलकार, विजय विरपे, अमोल डोके, बसवेश्वर देवमारे, धर्मराज घोडके, नगरसेविका श्रीमती शकुंतला नडगिरे, सौ रेहाना बोहरी, सौ रेणूका घोडके, सौ करुणा आंबरे, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, प्रभागातील माजी नगरसेवक नाना कवठेकर,सतीश परचंडे, नवलाखे, मुकूंद हरिदास, राजगोपाल भट्टड, राहूल परचंडे, ओंकार जोशी, शरद नलबिलवार, दिपक तुळजापूरकर, जयंत हरिदास आदी मान्यवर व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.






