Aurangabad

पेट्रोल पंपाच्या मँनेजरवर हल्ला करून साडेपाच लाख रूपये लंपास करणाऱ्या टोळीस अटक

पेट्रोल पंपाच्या मँनेजरवर हल्ला करून साडेपाच लाख रूपये लंपास करणाऱ्या टोळीस अटक

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : वेरूळ येथील पेट्रोल पंपांचे पैसे बँकेत जमा करण्यासाठी जाणाऱ्या मँनेजरवर हल्ला करून साडेपाच लाख रूपये लंपास करणाऱ्या टोळीला खुलताबाद पोलीसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वेरूळ येथील पेट्रोल पंपांचे मँनेजर अशोक गोपीनाथ काकडे हे सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पेट्रोल पंपांचे जमा झालेले ५ लाख ३७ हजार रूपये बँकेत जमा करण्यासाठी मोटारसायकलवर जात होते.

वेरूळ येथील उड्डाण पुलाखाली काही जणांनी मँनेजर काकडे यांना अडवून  प्राणघातक हल्ला करीत त्यांच्याजवळील ५ लाख ३७ हजार रुपयांची बँग हिसकावून पलायन केले. दरम्यान, पेट्रोल पंपांचे मालक विजय बोडखे यांनी या संदर्भात खुलताबाद पोलीसात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांनी इत्यंभूत माहिती घेत तांत्रिक विश्लेषणाद्वारे महत्वाची माहिती गोळा केली.

यानंतर पोलिसांनी तत्काळ प्रकाश कल्याण चुंगडे , महेंद्र रामदास सांळुके ( २१, रा. मजूर ता. वैजापूर) , नितीन घाशीराम राजपूत ( रा. खापरखेडा) , अर्जून मिठ्ठू ताटू ( रा. रूपवाडी ता. कन्नड ) यांना बुधवारी ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत संशयितांनी आणखी एकाच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबुल केले. आरोपींकडून रोख रक्कम ३ लाख ११ हजार ६७० तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी किंमत ( ६० हजार) , तीन मोबाईल किंमत १५००० रूपये असा एकूण ३ लाख ८६ हजार ६७० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपींना न्यायालयाने २४ जुलैपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button