विना कारण रस्त्यावर फिरणाऱ्या ५८ नागरीकांची परंडा येथे कोरोना तपासणी सर्वाचा अहवाल निगेटिव्ह दुसरी लाट ओसरू लागली
सुरेश बागडे परंडा
परंडा : तालूक्यातील कोरोनाची साखळी तोडण्या साठी प्रशासन कडक धोरण राबवित असून जनता कर्फ्यू मध्ये मोकाट फिरणाऱ्या ५८ नागरीकांना पकडून शनिवार दिनांक २९ रोजी परंडा येथील शिवाजी चौकात कोरोनाची तपासणी करण्यात आली आहे .
लॅब टॅक्नीशियन राजाभाऊ लांडगे , रविंद्र करपे व शहाजी नलावडे आरोग्य कर्मचारी विक्रम वाघ यांच्या पथकाने तपासणी केली
तपासणी करण्यात आलेल्या सर्व ५८ लोकांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सोडून देण्यात आले
प्रशासणाच्या प्रयत्ना मुळे परंडा तालूक्यातील कारोना ची लाट ओसरत असुन रूग्ण संख्या घटली आहे .
तहसिलदार अनिल कुमार हेळकर , पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे , प्रभारी मुख्याधीकारी तानाजी चव्हाण , प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ पठाण यांच्या मार्गदर्शना खाली , सहाय्यक पोलिस निरिक्षक राजकुमार ससाने , पो उप निरिक्षक दादासाहेब बनसोडे , नायब तहसिलदार मिलींद गायकवाड , नायब तहसिलदार गणेश सुपे , तलाठी चुकेवाड , नगर परिषदेचे कर्मचारी सातारकर , मुनिर जिकरे, प्रदिप शिंदे , महेश कसबे , संतोष दिक्षीत , गजानन हांगे , गजानन पाटील , बादेश मुजावर , नजीर लुकडे, रणजित काशीद, जलाल मुजावर,यांच्या पथकाने जनता कर्फ्यू असताना मोकाट फिरणाऱ्या नागरीकांना पकडून कारवाई केली आहे .
मुत्यू दर कमी करण्या साठी नागरीकांनी कोरोनाची तपासणी करून घ्यावे व विनाकारण घरा बाहेर पडू नये असे अवाहन नायब तहसिलदार गणेश सुपे यांनी केले आहे.






