Amalner

शासकीय कामात अडथळा आणला म्हणून वाळू माफियांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

?️ अमळनेर कट्टा…शासकीय कामात अडथळा आणला म्हणून वाळू माफियांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

अमळनेर पोस्टे हद्दीतील हिगोंणे शिवारातील बोरी नदिच्या पात्रातुन मोठया प्रमाणात अवैध गौण खनिजाचे उत्तखन्न करुन ट्रॅक्टरच्या साहय्याने गौण खनिज चोरी होत असल्याची तक्रार मा.श्री.प्रविण मुढे सो,पोलीस अधिक्षक जळगांव यांना प्राप्त
झाल्यावरुन त्याच्या आदेशान्वये मा.अप्पर पोलीस अधिक्षक सो.श्री.सचिन गोरे व मा.उपविभागिय पोलीस अधिकारी श्री.राकेश जाधव सो.यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.जयपाल हिरे पोलीस निरीक्षक व त्याचे सोबत पोउपनि.गंभीर शिंदे, पोहेकॉ/१०८६ राजेंद्र रघुनाथ कोठावदे, पोहेकॉ/३३१८ मधुकर पाटील,पोकॉ/१५७४ विलास बागुल,पोकॉ/३०१४ मिलिंद बोरसे पोकॉ/५३७ अमोल पाटील पोकॉ/११७९ योगेश बागुल अशा पथकाने गोपनिय रित्या रेती माफियांनी ठिक ठिकाणी उभे केलेले वार्चर ला चकवुन अमळनेर पोस्टे हद्दीतील हिगोंणा शिवारातील बोरी नदिच्या पात्रात वरिल सहकारी सह आज दि.15 रोजी सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास अचानक छापा ठाकुण गौण खनिज वाळु अवैध रित्या चोरी करुन वाहनात भरित असतांना व पोलीसांची चाहुल लागताच काही वाहने चालक हे वाहनाच्या रेती खाली उपसत असतांना मिळून आले.व काही ट्रॅक्टरचे चालक व मालक यांनी कर्मचा-याना हुज्जतबाजी करून ढकला ढकली करुन शासकीय कामात अडथळा निर्माण करून त्यांची वाहने पळवून नेली असुन घटनास्थळावर खालील वाहने ताब्यात घेण्यात आली आहे. ते
१) ३०००००/- किंचे लाल रंगाचे स्वराज कंपनीचे ७४४ मॉडेल ट्रक्टर क्र.एम.एच.१९ ए.एन ४९६० ट्रक्टरसह ट्रॉलीसह लाल रंगाची जु.वा.कि.अं
२)३०००००/- किं.चे लाल रंगाचे स्वराज कंपनीचे ८४३ मॉडेल ट्रक्टर क्र.एम.एच.१९ बी.जी. ४४९८ ट्रक्टरसह ट्रॉलीसह निळ्या रंगाची जु.वा.कि.अं.
३)३०००००/- किंचे महिंद्रा कंपनीचे लाल रंगाचे ट्रक्टर क्र.एम.एच.१९ बी.जी.०९९१ ट्रक्टरसह ट्रॉली निळ्या रंगाची जु.वा.कि.अं असे एकुण-९,००,०००/-रुपये
वरिल नमुद ट्रॅक्टरचे चालक व मालक १) मालक देवा लांडगे व त्याच्या ट्रक्टरवरील चालक ट्रक्टर चालक नाव गाव माहीत नाही. २) मालक सोनु उर्फ वैभव जगन्नाथ महाले ३) चालक दिपक गोविंदा पवार ४)मालक सुल्तानखाँ रहिमखाँ पठाण ५) चालक आत्माराम कैलास भोई ६) मालक प्रमोद उर्फ भैया सुभाष
महाजन ७) चालक अर्जुन शिवा पवार ८) मालक भु-या उर्फ भुरेखाँ पठाण व त्याच्या ट्रक्टर वरील चालक नाव गाव माहीत नाही यांचे विरुध्द पोहेकॉ/१०८६ राजेंद्र कोठावदे यांनी फिर्याद दिल्यावरुन गुरनं.३०७/२०२१ भादवि कलम
३५३,३३२,३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयात ६ आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.व दोन आरोपी फरार असुन गुन्हयातील दोन ट्रॅक्टर जप्त करणे बाकी आहे.नमुद गुन्हयाच्या तपास पोउपनिरी.गंभीर शिंदे करित आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button