Maharashtra

कोरोना आजारासाठी केलेल्या संचार बंदीमुळे मानवसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गोर-गरिबांना जिवनावश्यक वस्तूचे वितरण

कोरोना आजारासाठी केलेल्या संचार बंदीमुळे मानवसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गोर-गरिबांना जिवनावश्यक वस्तूचे वितरण

प्रतिनिधी सुनिल नजन

कोरोणा आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संचार बंदी असल्यामुळे गोरगरीब जनतेचे अन्न पाण्यावाचून प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत त्या मुळे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहोज येथील मानवसेवा प्रतिष्ठान आणि अहमदनगर शहरातील हर्ट काँन्व्हेंट हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व सरकारी नियमांचे पालन करून किराणा मालाचे वितरण करण्यात आले.पाथर्डी तालुक्यातील चितळी, तिसगाव,कासार पिंपळगाव,हनुमान टाकळी, कोपरे, मोहोज,या गावातील लाभार्थ्यांना किराणा मालाचे वितरण करण्यात आले. यावेळी प्राचार्या डॉ. करुणा शेंडे,सहकारी ग्लोरिया, प्रदिप रुपटक्के,मानवसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनिल मतकर सर,शनैश्वर सामाजिक संस्थेचे सचिव रोहित बुधवंत,अजय बुधवंत,अहील्यादेवी महिला बचत गटांच्या अध्यक्षा सुनिता घुले,बचतगटाच्या पर्यवेक्षिका पार्वती शिंदे, अंजली ओहोळ,मिना मिसाळ,मळू पाटील बोरुडे,सिस्टर खाडे ई.मांन्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक मतकर सर यांनी सुत्रसंचालन पत्रकार सुनिल नजन यांनी,वितरण शुभम मिसाळ यांनी तर आभार शुभम मतकर यांनी मानले. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button