पुराचे पाणी ओसरताच नगरपालिकेच्या वतीने साफसफाई व निजंतुकिकरणास सुरवात
नगरपालिका संचलीत सरकारी दवाखाना नियोजित वेळेत सेवेत विवेक परदेशी, आरोग्य सभापती
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपुर शहरात आलेल्या पुराच्या पाणी ओसरताच नगरपरिषदेचे वतीने स्वच्छता निजंतुकिकरण,धुर फवारणी करण्यात येत आहे. नगरपालिकेचे सरकारी दवाखाना व काळा मारुती दवाखाना येथेही पुराचे पाणी आले होते. पुराचे पाणी ओसरताच नगरपालिकेच्या स्वच्छता मोहीमेस सुरवात करण्यात आली. स्मशानभूमी, सरकारी दवाखान्याची, पंढरपूरातील पाण्याखाली गेलेले पुल, रस्ते साफसफाई, निजंतुकिकरणास सुरवात करण्यास सुरवात करण्यात आली. नगरपालिका संचलीत सरकारी दवाखाना व काळा मारुती दवाखान्यात स्वच्छता करण्यात आली. नियोजीत वेळेत दवाखाना सुरु आहे, नागरिकांनी लाभ ध्यावा असे आरोग्य सभापती परदेशी यांनी सांगितले.
सोमवार ते शनिवार नगरपरिषद संचलीत सरकारी दवाखाना (गोवींदपुरा) सकाळी ९.०० ते १२.३० व काळा मारुती सेंटर दुपारी ५.०० ते ६.३० या वेळेत चालु राहील.तसेच पंढरपूरात पुढील काही दिवस विविध भागात स्वच्छता मोहीम व निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम राबवली जाणार आहे. कोरोना व पुर संकटाच्या पार्श्वभूमीवर कोणीही,कोणताही त्रास झाल्यास अंगावर काढु नये, तातडीने वैद्यकीय मदत, उपचार घ्यावा, शरीर ही संपत्ती आहे, आपला फिटनेस व रोगप्रतीकारक शक्ती कशी वाढेल याकडे नागरिकांनी लक्ष द्यावे व सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य सभापती विवेक परदेशी यांनी केले.






